Mumbai News | मुंबईत पार्किंगमध्ये 48 जिवंत काडतुसं आढळल्याने मोठी खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – मुंबईतील (Mumbai News) आरे दूध कॉलनीजवळील (Aarey Milk Colony) एका पार्किंगमध्ये 48 जिवंत काडतुस (48 live cartridges) आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. 29) रात्री ऩऊच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. सापडलेली काडतुस 0.2 मिमी प्रकारची असून पार्किंग परिसरात ती कोणी सोडली आणि का सोडली? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काडतुसं जप्त केली आहेत. Mumbai News | 48 live cartridges found in parking lot near Aarey Milk Colony of mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

स्थानिक पोलीस अधिकारी प्रसाद पिटले (Police officer Prasad Pitale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबईच्या आरे मिल्क कॉलनीतील एका पार्किंगमध्ये काही जिवंत काडतुसे (cartridges ) आढळल्याची माहिती स्थानिकानी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसानी घटनास्थळी धाव घेत काडतुस जप्त केली आहेत. पार्किंग (Parking) परिसरातील सीसीटीव्हीत काही संशयास्पद हालचाली आढळतात का? याचा तपास पोलीस करत आहेत. हा पार्किंग परिसर गजबजलेला असल्याने या ठिकाणी बऱ्याच लोकांनी ये-जा केली आहे. त्यामुळे संबंधित काडतुसे नेमकी कोणी ठेवली हे शोधण्यात अडचणी येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सध्या पोलिसांकडून पार्किंग परिसरात तैनात सुरक्षा रक्षक आणि काडतुसे पाहिलेल्या अन्य साक्षीदारांचे जाब नोंदवून घेण्यात येत आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Web Title :- Mumbai News | 48 live cartridges found in parking lot near Aarey Milk Colony of mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू