Advt.

बँक बुडाली तर बुडणार 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम, जाणून घ्या तुमचे डिपॉझिट सुरक्षित आहे किंवा नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जेव्हा एखादी बँक दिवाळखोरीत निघते, तेव्हा ग्राहकाकडे एकमेव दिलासा डिपॉझिट इन्श्युरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजे डीआयसीजीसीद्वारे DICGC देण्यात येणारे इन्श्युरंस कव्हर असते. 4 फेब्रुवारी 2020 पासून डीआयसीजीसी अंतर्गत इन्शुरन्स कव्हर 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे.

ईटीच्या रिपोर्टनुसार, 4.8 कोटी खात्यांमध्ये जमा रक्कम अजूनही सुरक्षित नाही. आरबीआयच्या ताज्या वार्षिक रिपोर्टनुसार मार्च 2021 पर्यंत 252.6 कोटी खात्यांपैकी 247.8 कोटी खात्यांचाच इन्श्युरन्स आहे. म्हणजे 4.8 कोटी खात्यांवरील रक्कम डीआयसीजीसीच्या DICGC अंतर्गत वीमा नसलेली आहे म्हणजे या खात्यांवर जमा रक्कम बँक बुडल्यास बुडू शकते.

बँकेत जमा केलेल्या रक्कमेपैकी जवळपास 49.1% चा नाही विमा
रिपोर्टनुसार, मार्च 2021 च्या अखेरपर्यंत एकुण वीमा असलेली जमा रक्कम 76,21,258 कोटी रुपये होती. ही 1,49,67,776 रुपयांच्या मुल्यांकन योग्य जमाच्या केवळ 50.9 टक्के आहे. याचा अर्थ हा आहे की, बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेच्या जवळपास 49.1 टक्के डीआयसीजीसी कव्हरमध्ये नाही.

डीआयसीजीसी कव्हर सर्व बँकांसाठी उपलब्ध आहे, त्यांना या सुविधेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागते आणि इन्शुरंस प्रीमियम भरावा लागतो. आरबीआयच्या रिपोर्टनुसार, बँकांचे डीआयसीजीसीसोबत रजिस्टर न होणे किंवा प्रीमियम न भरणे, जमा रक्कमेला कव्हर न करण्याचे मुख्य कारण आहे.

असे चेक करा तुमची बँक यासाठी रजिस्टर आहे का?
अनेक को-ऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना इंन्शुरन्स कव्हर देण्यासाठी डीआयसीजीसी सोबत रजिस्टर नाहीत. जर तुमचे पैसे को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा आहेत, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून चेक करू शकता की, तुमची बँक डिपॉझिट इंश्युरन्ससाठी रजिस्टर आहे किंवा नाही…

ही आहे लिंक-
https://www.dicgc.org.in/FD_ListOfInsuredBanks.html

Also Read This : 

Pune : पुण्यात रुग्णवाहिकांसाठीचे नवे दर निश्चित

 

तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ; जाणून घ्या

 

भाजपच्या महिला खासदारावर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांनीही उचलला नाही फोन Video

 

अशक्तपणा दूर करण्यासाठी करा घरगुती उपाय