इंदापूर तालुक्यातील दलित वस्तीसाठी जिल्हा परिषदेकडून 49 लाखाचा निधी : प्रविण माने

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन – पूणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून इंदापूर तालुक्यातील दलित समाज बांधवांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या विविध विकास योजनांतुन विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यासाठी एकूण ४९ लाख रूपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती पूणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी इंदापूर येथे बोलताना दिली.

ते म्हणाले की जिल्हा परिषद बांधकाम (दक्षिण) विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येत असतात. या योजनांचा पुरेपूर फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब दलित समाज बांधवांना मिळावा या हेतुने इंदापूर तालुक्यातील दलित वस्तीतील विविध विकास कामांसाठी ४९ लाख रूपये निधी मंजूर झाला असुन त्या निधीतून खालील कामे करण्यात येणार असल्याचे प्रविण माने यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील न्हावी येथे बौद्धविहार सांस्कृतिक सभामंच व ब्लाॅक बसविणे ४ लाख, बीजवडी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभिकरण करणे ३ लाख, शेटफळ हवेली येथे अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह बांधणे ५ लाख, बावडा बौद्ध विहार परिसर सामाजिक सभागृह बांधणे ५ लाख, वडापूरी दलीत वस्ती सामाजिक सभागृह बांधकाम १० लाख, तक्रारवाडी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभाग्रह बांधणे ५ लाख, पळसदेव येथे दलितवस्ती सामाजिक सभागृह व सुशोभिकरण ७ लाख, सणसर येथे अण्णाभाऊ साठेनगर सभामंडप बांधकाम ५ लाख, सणसर अशोकनगर येथे बौद्धविहार बांधकाम ५ लाख रूपये असे एकुण ४९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असुन त्यातुन दलित वस्तीतील अनेक कामे मार्गी लागणार असल्याचे प्रविण माने यांनी सांगीतले.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like