पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेशाबाबत 23 गावातून 491 हरकती दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत उर्वरित २३ गावे समाविष्ट करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता २३ गावांमधून या समावेशासंदर्भात ४९१ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातून मनपाच्या हद्दीत उर्वरित गावे समाविष्ट करण्याच्या हरकतींवर पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यापुढे ही सुनावणी होणार आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी एक महत्तवपूर्ण माहिती दिली आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या हरकतीवर ऑनलाइन सुनावणी घेतली जाणार आहे. यावरून आता उर्वरित असणाऱ्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्येच आगामी १९ आणि २० एप्रिलला या हरकती व सुचनांबाबत सुनावणी घेतली जाणार असल्याचे राव यांनी म्हटले आहे. असे विभागीय आयुक्त राव यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित ग्रामपंचायतींना पत्राच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच, या गावांपैकी असणाऱ्या सर्वाधिक ३८९ हरकती पिसोळी या गावामधून दाखल झाल्या आहेत. इतर गावांपैकी सूस, कोपरे, नऱ्हे, वडाची वाडी, नांदोशी आणि किरकटवाडी येथून प्रत्येकी १, होळकरवाडीतून २, मांजरी बुद्रूक, कोळेवाडी आणि वाघोलीतून प्रत्येकी ५ आणि नांदेड ग्रामपंचायतींच्या हद्दीतून ६८ हरकती आल्या आहेत.

या दरम्यान, पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात येणाऱ्या मुख्य गावांपैकी सूस, कोपरे, नऱ्हे, वडाची वाडी, नांदोशी, किरकटवाडी, होळकरवाडी, मांजरी बुद्रूक, कोळेवाडी, वाघोली, नांदेड, पिसोळी यासह २२ गावांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर ज्यावेली ऑनलाइन सुनावणी संदर्भात संबंधित ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाइन लिंक दिली जाणार आहे. सुनावणीसाठी स्वतंत्र स्लॉट उपलब्ध असून या स्लॉटची माहिती संबंधित असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर याची माहिती देण्यात येईल. याव्यतिरिक्त संबंधित हरकती दिलेल्या वैयक्तिकरित्या नोटिसा दिले जाणार आहे. या ग्रामपंचायतींपैकी पिसोळीचा अपवाद वगळता इतर सर्व ग्रामपंचायतींच्या हरकतींवर १९ एप्रिलला तर केवळ पिसोळी गावाची सुनावणी ही २० एप्रिल रोजी होणार आहे. असे सांगण्यात आले आहे.