महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 5,534 उमेदवारांचा अर्ज दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह तब्बल 5,534 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून सर्वाधिक 135 उमेदवारांनी अर्ज दाखल केले, तर सर्वात कमी चार उमेदवारांनी मुंबईतील माहीम आणि सेवरी येथून अर्ज दाखल केले.

राज्यातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. या जागेवरुन कॉंग्रेसचे आशिष देशमुख हे फडणवीस यांच्या विरोधात लढत आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, मला विश्वास आहे की आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत. मी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल.

महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए  5,534 प्रत्शशियों ने दाखिल किया नामांकन दाखिल किया

अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधून निवडणूक लढवत आहेत. गृहमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री गणेश नाईक यांनी अनुक्रमे शिर्डी व ऐरोली मतदारसंघातून अर्ज दाखल केला. नाईक यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना नेते शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाराष्ट्राचे हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा सामना भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांच्याशी होईल. पवार म्हणालेकी , निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी, बारामतीतील लोक माझ्यावर किती विश्वास ठेवतात हे महाराष्ट्रातील लोक पाहतील.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कणकवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितेश राणे यांनीही अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर होती तर उमेदवारी अर्जांची तपासणी 5ऑक्टोबरला होणार आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे . राज्यातील विधानसभेच्या २88 जागांसाठी होणार्‍या निवडणुका 21 ऑक्टोबरला होणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकाल लागणार आहेत.

Visit : Policenama.com