माधुरी दीक्षितसह 90 च्या दशकातील ‘या’ 5 अभिनेत्री करतात वयावर ‘मात’, ‘आलिया-कॅटरिना’ देखील पडतात ‘फिक्क्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस स्वत:ला फिट अँड यंग ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. बॉलिवूडमध्ये अशाही काही अ‍ॅक्ट्रेस आहेत ज्या वयाच्या ठराविक टप्प्यावर पोहल्यानंतर आजही तितक्याच फिट आणि यंग दिसतात. आज आपण अशाच 5 अभिनेत्रींबाबबत जाणून घेणार आहोत ज्या 90 दशकातील आहेत परंतु आजच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात.

1) माधुरी दीक्षित – 1984 साली आलेल्या अबोध या सिनेमातून माधुरीनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 1999 मध्ये माधुरीनं अमेरिकेचे सर्जन डॉ श्रीराम नेने सोबत लग्न केलं. माधुरीला अरिन आणि रायन अशी दोन मुलं आहेत. माधुरी आजही आलिया, कॅटरीना यांना टक्कर देते.

2) जुही चावला – जुही 90 च्या दशकातील फेमस अ‍ॅक्ट्रेस आहे. जुहीनं 1995 साली बिजनेसमन जय मेहता सोबत लग्न केलं होतं. यानंतर जुही सिनेमांमध्ये खूपच कमी दिसली. सौंदर्याच्या बाबतीत आजही जुही चर्चेत असते. तिला जहान्वी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. आजही ती खूपच सुंदर आणि यंग दिसते.

3) काजोल – नुकतीच काजोल तान्हाजी सिनेमात दिसली होती. तान्हाजी सिनेमातही ती तितकीच यंग दिसली जेवढी ती 90 च्या दशकात दिसत होती. अजय देवगण आणि तिला दोन मुलं आहेत. नीसा आणि युग अशी त्यांची नावं आहेत. आजही सौंदर्याच्या बाबतीत ती अनेक अ‍ॅक्ट्रेसला मात देते.

4) रवीना टंडन – रवीनानं 90 च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आहेत. मोहरा सिनेमातील टीप टीप बरसा पानी या गाण्यानं तिनं प्रेक्षकांच्या काळजात आग लावली. रवीनाला रक्षा थडानी आणि रणबीर थडानी अशी दोन मुलं आहेत. आजही रवीना खूपच सौंदर्य दिसते.

5) भाग्यश्री – भाईजान सलमान खानच्या मैने प्यार किया सिनेमातून सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री भाग्यश्री आजही खूप सुंदर दिसते. आपल्या पहिल्या सिनेमानंतर तिनं बिजनेसमन हिमालय डसानी सोबत 1990 साली लग्न केलं. तिला अभिमन्यू आणि अवंतिका अशी दोन मुलं आहेत. 50 वर्षांची भाग्यश्री आजही तितकीच सुंदर दिसते.