जळगाव येथील युवकाच्या खून प्रकरणी पुण्यातून ५ जणांना अटक

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मु.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा.आसोदा) याच्या खून प्रकरणात फरार झालेल्या पाच संशयितांना रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली. २४ तासांत हल्लेखोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, मुकेश याच्यावर रविवारी सकाळी आसोदा येथे पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरुण सोनवणे, तुषार नारखेडे, किरण हटकर, मयुर माळी, समीर सोनार अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, समीर हा पोलिसाचा मुलगा असून त्याचे वडील मुख्यालयात कार्यरत आहेत. यापूर्वी इच्छाराम पुंडलिक वाघोदे (रा. समता नगर) याला अटक झाली आहे.

दरम्यान, आपल्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रामानंदनगरचे निरीक्षक दीपक बुधवंत यांची बदली नियंत्रण कक्षात केली आहे. त्यांचा पदभार सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

मु. जे. महाविद्यालयात मुकेश सपकाळे याचा शनिवारी चॉपरने वार करुन खुन करण्यात आला होता. या घटनेनंतर संशयित तेथून लगेच पुण्याला फरार झाले होते. त्यांच्या शोधार्थ ६ पथके रवाना झाली होती.
हल्ला केल्यानंतर पाचहीजण शिरसोलीमार्गे पाचोराकडे रवाना झाले. शिरसोली गावाजवळ सर्वांनी आपले मोबाईल बंद केले. रात्री आठ वाजता ते पाचोरा रेल्वे स्थानकावरुन रेल्वेने पुण्याकडे आले. सिंहगड भागात राहणाऱ्या कार्तिक चौधरी यांच्या फलॅटवर ते पोहचले. घटना घडल्यापासून ते कार्तिकच्या संपर्कात होते. कार्तिक हा शिक्षणासाठी पुण्यात आला आहे.

या गुन्ह्याने जळगावात एकच खळबळ माजली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक उगले हे स्वत: पोलीस ठाण्यात ठाण मांडून तपासाची माहिती घेत होते. दुसरीकडे जोपर्यंत हल्लेखोरांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने पेच निर्माण झाला होता.

शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांनी नातेवाईकांची समजूत घातल्यानंतर पोलीस बंदोबस्तात मुकेश सपकाळे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुकेश हा तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी तर त्याचा लहान भाऊ रोहित हा अकरावी प्रवेश घेण्यासाठी कॉलेजमध्ये आले होते. त्यांच्या दुचाकीला इच्छाराम वाघोदे याच्या दुचाकीची धडक बसली होती. यावरुन झालेल्या वादावादीत वाघोदे व त्याच्या मित्राने मुकेशवर चॉपरने वार करुन त्याचा खुन केला होता.

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

You might also like