वज्रेश्वरी मंदिर दरोडाप्रकरणी पोलिसांनी ‘त्या’ ५ जणांच्या आवळल्या ‘मुसक्या’

ठाणे : पोलिसनामा ऑनलाइन – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असणाऱ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या ठाणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी शहापूर परिसर आणि दादरा व नगर हवेली येथून पाच दरोडेखोरांना अटक केली असून ते ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

गोविंद गिंभल, विनीत चिमडा, भारत वाघ, जगदीश नावतरे, प्रवीण नावतरे अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख ८३ हजार रुपये जप्त केले आहेत. अद्याप तीन दरोडेखोर फरार आहेत. चौकशी केल्यानंतर त्यांनी दरोडा टाकल्याची माहिती पोलिसांना दिली.

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात १० मे रोजी पहाटे सशस्त्र दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बांधून ठेवले आणि दानपेट्या फोडून सात लाख दहा हजारांची रोकड लंपास केली होती. दरम्यान, पोलिसांकडून रात्रंदिवस दरोडेखोरांचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांकडून ठाणे जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरही पथके रवाना झाली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like