बारामतीमध्ये भाजप नेते प्रशांत सातवसह 5 जणांना अटक

बारामती :  पोलीसनामा ऑनलाइन –   बारामती शहरतालीत भिगवण रोडवर अतिक्रमण काढण्याचे काम सुरु होते. नगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमण काढत असताना भाजप नेते प्रशांत सातव यांच्याह पच जणांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी प्रशांत सावत यांच्यासह पाचजणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.14) भिगवण रस्त्यावर पंचायत समिती चौकाजवळील अब्दुलपूरकर इस्टेट येथे घडली.
प्रशांत उर्फ नाना पांडुरंग सातव (वय-49 रा. कसबा, बारामती), शिवाजी भानुदास जाधव (वय-39 रा. सावतामाळीनगर, कसबा, बारामती), सुहास चंद्रकांत क्षीरसागर (वय-32 रा. जगताप मळा, कसबा, बारामती), सागर राजेंद्र आगम (वय-23) आणि प्रसाद बाळासाहेब आगम (वय-23 दोघे रा. श्रीरामनगर, कसबा, बारामती) असे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नगरपालिकेचे नगर अभियंता रमेश अभंगराव मोरे (राय सायली हिल, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

नगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण काढण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपींनी या ठिकाणी येत काम बंद करण्याबाबत लोकांना इशारा दिला. तसे बेकायदा गर्दी जमवून आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला. काम कसे सुरु करता हे बघतो, अशी धमकी देखील त्यांनी दिली. याप्रकरणी या पाच जणांविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणण्यासाह साथ रोग प्रतिबंधक अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल आहे.