बडीशेप खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे तुम्हाला माहितीयेत का ?

पोलिसनामा ऑनलाईन – अनेकजण जेवणानंतर बडीशेप खातात. यात तांबे, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅगनीज, सेलेनियम, झिंक आणि मॅग्नेशियमसारखे क्षार आणि धातू असतात. यामुळं पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. मुखवास म्हणून याचा जास्त वापर केला जातो. आज आपण बडीशेपच्या फायद्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

1) बडीशेप खाल्ल्यामुळं त्वचेसंबंधी असलेल्या तक्रारी दूर होतात. त्यामुळं चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या असेल आणि अशांनी जर बडीशेपचं नियमित सेवन केलं तर या तक्रारी दूर होतात.

2) रक्तशुद्धी करण्याासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे बडीशेप. बडीशेपमध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळं शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात.

3) ज्यांना डोळ्यांशी संबंधित कोणती समस्या आहे, अशा व्यक्तींनी रोज बडीशेप खावी. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन अ, अमिनो अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडंट यांचं प्रमाण मुबलक प्रमाणात असतं. खास बात अशी की, यामुळं डोळ्यांना फायदा होतो.

4) शरीरात उष्णता निर्माण झाल्यास बडीशेपचं पाणी प्यावं. त्यामुळं त्वचेला आणि शरीराला थंडावा मिळतो.

5) अपचन, गॅस झाल्यास बडीशेप चावून खावी. त्यामुळे अन्नपचन सुरळीत होतं आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे किंवा तुम्हाला सूट न होणारे पदार्थ वापरणं किंवा सेवन करणं टाळावं.