उन्हाळ्यात वजन कमी करायचंय, मग हे आवश्य वाचा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर भूक कमी लागते, हे सर्वांचाच अनुभव असतो. तसेच द्रव पदार्थ घेण्याकडे सर्वांचा कल असतो. शरीरातील पाणी कमी होण्याची प्रकिया वेगाने होत असल्याने शरीराला आवश्यक तेवढे पाणी मिळावे यासाठी द्रव पदार्थ पिण्याची इच्छा होते. या दिवसात आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. पेय पदार्थांच्या मदतीने वजन कमी करणं सहज शक्य होतं. जर उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर यासाठी काही उपाय आहेत. कोणते ते पाहुयात.

या दिवसात वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये हेल्दी स्नॅक्सचा समावेश केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये फळभाज्यांचे सेवन केले पाहिजे. फळभाज्या पचण्यास हलक्या असतात. त्यांच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन मुबलक असतं. अशा फळभाज्यांपासून न्हाळ्यामध्ये तयार करण्यात येणारं स्नॅक्स वजन कमी करण्यास मदत करतात. रोस्टेड चणे चिप्सप्रमाणे कुरकुरीत असतात. परंतु यामध्ये टीम आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. हे तयार करण्यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑइल, एक चिमुटभर मीठ आणि जीरं बेक्ड करून घ्या. हे खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं.

सेच अंड्याचे सेवन केल्यास भूक वाढविणारे हार्मोन्स कमी होतात. अंड्यामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असतं. अंड्याचा डाएटमध्ये समावेश करू शकता. वजन कमी करण्याचं नियोजन असेल तर सर्वात आधी भूकेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. सर्वात आधी एक ब्राउन ब्रेड घेऊन त्यावर लो फॅट पनीरच्या चूऱ्याची एक लेयर तयार करा. त्यावर दालचीनी पावडर टाका. यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते. उन्हाळ्यात या स्नॅक्सचा आहारात समावेश करून तुम्ही वजन कमी करू शकता. तत्पुर्वी, आहारतज्ज्ञांचा सल्ला जरूर घेणं अत्यंत गरजेचे आहे.