कोरोनात फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यासाठी श्वसनाचे 5 महत्त्वाचे व्यायाम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना विषाणू हा व्यक्तीच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे लोकांची श्वसनसंस्था निकामी होण्याचा धोका वाढला आहे. कोरोना काळात लोकांनी आपले आरोग्य आणि श्वसनसंस्था सुरक्षित ठेण्याच्या काही टीप्स फॉलो करणे गरजेचे आहे. आपली श्वसनसंस्था आणि आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी काही व्यायाम प्रकार आहेत. जाणून घ्या हे व्यायाम प्रकार कोणते आणि कसे करायचे…

1. डायफ्रामामॅटिक श्वास

या व्यायाम प्रकारामुळे ताण आणि राग कमी करण्यास मदत होते. लोक सहसा त्यांच्या फुफ्फुसांचा परिपूर्ण वापर करत नाहीत. या व्यायाम पद्धतीने फुफुसांची श्वसन क्षमता वाढण्यास मदत होते.

कसा करायचा हा व्यायाम- जमिनीवर रिलॅक्स पणे बसा. एक हात छातीच्या खाली आणि पोटाच्या वरती ठेवा. Diaphragm याच ठिकाणी असते. मोठा श्वास घेऊन तो हळूहळू बाहेर सोडा.

2. खोल श्वास

खोल श्वास हा व्यायाम प्रकार सर्वात सोपा आणि तितकाच महत्वाचा आहे. यामुळे तुमची फुफ्फुस मजबूत होतातच शिवाय रक्तप्रवाह सुधारतो. तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि ताण कमी होतो.

कसा करायचा व्यायाम – हा व्यायाम करताना जमिनीवर निवांतपणे बसा. एक मोठा श्वास घ्या. यावेळी श्वास घेण्याचा आणि श्वास सोडण्याची वेळ मोजा. प्रत्येक श्वासागणिक वेळ वाढवा. हा व्यायाम 2 ते 5 मिनटांपर्यंत नियमित करावा.

3. भ्रामरी

भ्रामरी हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ माशी असा होतो. हा गुंजन करणारा प्रकार असून यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो. यामध्ये तुम्ही तुमच्या अंगठ्याने कान बंद करा आणि मधले बोट आणि अनामिकेने डोळे बंद करा. तर्जनी भुवयांच्यावरती ठेवा आणि करंगळी गालावर ठेवा. श्वास घेताना माशीसारख्या गुंजन्याचा (हम्म्म) आवाज करा. 10 मिनिटांपर्यंत तुम्ही हा व्यायाम करु शकता.

4. अनुलोम-विलोम

याला नाकपुड्यांचा श्वास असेही म्हटले जाते. हा प्राणायामचा प्रकार असून हटयोगामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यायामामुळे श्वसनसंस्थेची शक्ती वाढवण्यास मदत होते. हा व्यायाम रिकाम्या पोटी करावा असा सल्ला तज्ज्ञ देतात.

कसा करायचा व्यायाम – जमिनीवर किंवा खुर्चीवर बसा. उजव्या हाताचा अंगठ्याने तुमची उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. त्यानंतर उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. मधल्या बोटाने आणि करंगळीच्या शेजारच्या बोटाने डावी नाकपुडी बंद करा. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. हीच प्रक्रिया वारंवार करा.

5. हृदय व्यायाम

या व्यायाम प्रकाराचा फायदा तुम्हाला हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी होतो. यामुळे तुमच्या शरिरात अधिकप्रमाणात ऑक्सिजन घेतले जाते. यामध्ये जोरात चालणे, स्पॉट जॉगिंग, दोरी उड्या, पायऱ्या चढणे या पद्धतीचा समावेश या व्यायामात होतो.