धक्कादायक ! खेळताना धान्य साठवण्याच्या कोठीत पडल्याने 5 मुलांचा गुदमरून मृत्यू

पोलीसनामा ऑनलाईनः खेळताना धान्य साठवण्याच्या कोठीत पडल्याने गुदमुरून 5 मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या हिम्मतसार येथे रविवारी (दि. 21) ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सेवाराम (वय 4), रविना (वय 7) , राधा (वय 5), पूनम (वय 8) आणि माली अशी मृत्यू पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. वरीष्ठ पोलीस अधिकारी प्रिति चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकामी असलेली धान्याची कोठी घरासमोर ठेवली होती. कोठीचे झाकण उघडे होते. दरम्यान मुलांनी खेळता- खेळता एकापाठोपाठ एक असे सर्वांनी त्यात उड्या मारल्या. हा प्रकार सुरु असताना अचानक कोठीचा दरवाजा बंद झाला आणि गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान मुलांची आई घरी आली. त्यावेळी मुल घरी दिसत नाहीत, म्हणून तिने शोधाशोध सुरु केली. जेंव्हा तिने धान्याच्या कोठीचा दरवाजा उघडून आत पाहिले त्याेळी सर्व मुले बेशुध्दावस्थेत पडली होती. तिने 5 ही मुलांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.