राज्यात 5 दिवस पावसाचे; मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) मागच्या आठवड्यात मान्सूननं Monsoon व्यापलं आहे. अनेक ठिकाणी जोरदार मुंसडी मारली आहे. यानंतर राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. पण आजपासून पुढील पाच दिवस राज्यात (5 days of rain in state) विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. आज उत्तर कोकण, दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र Central Maharashtra आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची rain शक्यता आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

LIC New Children’s Money Back Plan | LIC च्या ‘या’ पॉलिसीत 150 रुपये गुंतवत राहा; तुमचं मूल होईल ‘लखपती’

मुंबईत मान्सूनचं (Monsoon in mumbai) आगमन झालं.
आणि पावसानं मुंबईकरांना चांगलंच झोडपून काढलं. पहिल्या पावसातचं मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली होती.
पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसानं विश्रांती दिली आहे.
त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
पण आज पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.
त्याचबरोबर रायगडमध्ये अतिवृष्टीचा (Very Heavy rainfall) इशारा देण्यात आला आहे.

उद्या (१६ जून) रोजी सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उद्या मुंबई आणि पुण्यात सामान्य हवामान असेल, अशी माहिती हवामान खात्याकडून Meteorological Department देण्यात आली आहे. आज पुणे, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी या सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याच्या साथीनं मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याची सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : 5 days of rain in state very heavy of rainfall in konkan and in mumbai

हे देखील वाचा

Dilip Walse Patil | मराठा आरक्षणाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा!; गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले…

Ayodhya Shri Ram Janmabhoomi land scam । राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा ? अजित पवार म्हणाले..

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना