उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्याच्या ‘या’ 6 स्पेशल टिप्स? उष्णता आणि डिहायड्रेशनपासून सुद्धा दिलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : उन्हाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. तसचे आपली इम्यून सिस्टम सुद्धा प्रभावित करतो. पचन आणि त्वचासंबंधी समस्यांसह फ्लू आणि संसर्गाचा सुद्धा या काळात धोका असतो. सोबतच उष्णतेमुळे सुद्धा मोठे नुकसान होते. उन्हाळ्यात आजारांपासून वाचण्याच्या टिप्स जाणून घेवूयात…

1 हायड्रेटेड रहा :
शरीरात योगप्रमाणात पाणी असेल तर तुम्ही 90 टक्के आजारांशी लढू शकता. उन्हाळ्यात शरीरातील पाणी लवकर कमी होते, म्हणून भरपूर पाणी प्या.

2 फायबर इनटेक :
धान्य, भाज्या, शेंगा आणि फळे हे फायबरचे चांगले स्त्रोत आहेत. यामुळे पचनशक्ती वाढते, पोटाच्या समस्या दूर होतात.

3 कमी कॅफीन :
उन्हाळ्यात कॅफीनच्या जास्त सेवनाने पचनशक्ती बिघडू शकते. तसेच अनेक समस्या होऊ शकतात. चहा, कॉफीचे प्रमाण कमी करा.

4 वर्कआऊट :
वर्कआऊटमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. शरीर फिट आणि निरोगी राहते.

5 उन्हात जाणे टाळा :
कडक उन्हापासून दूर रहा. सूती आणि हलके कपडे घाला. जास्तवेळ उन्हात राहिल्यास आजारी पडू शकता.

6 नियमित हेल्थ चेकअप :
आजारांची लक्षणे अनेकांना समजत नाहीत. यासाठी नियमित हेल्थ चेकअप करा. गंभीर आजारांवर यामुळे वेळीच उपचार करता येतात.