झाड पडल्याच्या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे ५ जवान जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहर परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडपडीच्या जवळपास ४० घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे झाली. कोरेगाव पार्क येथे रात्री अकरा वाजता झाड पडलेल्या ठिकाणी काम करीत असताना अग्निशमन दलाचे पाच जवान जखमी झाल्याची घटना घडली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’77af8ead-c6be-11e8-b88b-5dfa5bdc329a’]

येरवडा व कोरेगाव पार्क परिसरात झाडपडीच्या जास्त घटना घडल्या. गल्ली क्रमांक ७ या ठिकाणी झाड पडून रस्ता बंद झाला होता. अग्निशमन दलाच्या मुख्यालयातील २ रेस्क्यू वाहने याठिकाणी दाखल होती. घटनास्थळी चेनसॉच्या साह्याने झाड हटवण्याचे काम जवान करीत असताना अचानक झाडाची एक मोठी फांदी जवानांच्या अंगावर उंचावरुन कोसळली. यामध्ये दलाचे २ वाहनचालक व ३ फायरमन जखमी झाले. तसेच त्याठिकाणी असणारा एक नागरिक ही जखमी झाला आहे. जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असता वाहनचालक नितिन कांबळे यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना उपचारासाठी दाखल केले असून दुसरे वाहन चालक बंडू गोगावले व फायरमन छगन मोरे, भुषण सोनावणे, आझीम शेख यांना मुका मार लागल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले.

पुणे/पिंपरी : ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तडीपार गुंडाकडून लैंगिक अत्याचार

मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका कोरेगाव पार्क, येरवडा परिसराला बसला. कोरेगाव पार्क भागातील लेन नं. ५, नॉर्थ मेन रोडवर अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. त्यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. त्यात जोरदार पावसाने जागोजागी तळे साचले. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांवर झाडे पडल्याने त्यात काही गाड्यांचे नुकसान झाले. नॉर्थ मेन रोडवरील वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली. यावेळी परिसरातील तरुण मदतीला धावले. त्यांनी रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या बाजूला केल्या. झाडाच्या फांद्यांखाली दबलेली वाहने बाजूला केली व तासाभराने येथील वाहतूक सुरू झाली.

[amazon_link asins=’B077ZDLY8T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a618c78-c6be-11e8-a8e4-d9a02af09fbe’]

अग्निशामक दलाच्या चार गाड्या रात्रभर रस्त्यावरील झाडे हटविण्याचे काम करीत होते. राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक कोंडी, वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडल्या होत्या.