‘या’ पदार्थांमुळे ‘मेटाबॉलिज्म’ स्लो झाल्यानं माणसं होतात लठ्ठपणाचे शिकार, जाणून घ्या

पोलीसनामा ओनलाईन – मेटाबॉलिज्म शरीरातील एक असे कार्य आहे, ज्यामाध्यमातून शरीरामध्ये ऊर्जा तयार होते. तसेच जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मेटाबॉलिज्म मंद गतीचे झाले असेल तर अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात पुरेशी ऊर्जा राहत नाही. शरीर सुस्त, थकल्यासारखे वाटते. शरीर ऊर्जेचा पुरेपूर वापर करु शकत नसल्याने लठ्ठपणा येतो. मेटाबॉलिज्म फास्ट असेल तर शरीरात ऊर्जा खूप असते.

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी चांगला व्यायाम करणं महत्वाचं आहे. त्याप्रमाणे आहार चांगला आणि संतुलित असायला हवा. चुकीचा आहार घेतल्यास शरीरातील मेटाबॉलिज्म सुरुळीत राहत नाही. आज आम्ही तुम्हाला मेटाबॉलिज्म जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांबाबत सांगणार आहोत. असे पदार्थ तुम्ही आपल्या आहारातून वगळले पाहिजेत.

१. बटाटा

बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि व्हिटामिन सी असते. त्यामुळे दररोजच्या आहारात बटाट्याचा समावेश केल्यास वजन वाढते.

२. गोड पदार्थ

साखरेच्या अति सेवनामुळे मेटाबॉलिज्म मंद गतीने होतं असल्यामुळे शरीरातील चरबी वाढते. एवढंच नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण वाढल्यानं सतत आजरांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून तुम्हाला गोड खावसं वाटत असेल तर फळांचा आहारात समावेश करावा.

३. तांदूळ

अति कार्बोहायड्रेट असलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. साखर, बटाटा आणि तांदळामध्ये जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे चरबी वाढते. असे चरबी वाढवणारे पदार्थ शक्यतो टाळण्याचे प्रयत्न करा.

४. मादक पदार्थ

अल्कोहोलचं सेवन केल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म कमी होतं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर केला जातो. तसेच त्याचा लिव्हरवर सुद्धा वाईट परिणाम दिसून येतो. प्रमाणापेक्षा जास्त या पदार्थाचं सेवन केल्यास लठ्ठपणा येऊ शकतो.