‘५-जी’ तंत्र तुमच्यासाठी तारक मात्र आमच्यासाठी मारक 

हेग : वृत्तसंस्था – नेदरलँडमधील ‘हेग’ या शहरात ‘५-जी’ नेटवर्कची चाचणी सुरू असतानाच जवळपास तब्बल ३०० हून अधिक पक्षी अचानक मरण पावले आहेत. ही गंभीर आणि दुर्दैवी घटना ‘५-जी’ नेटवर्कमधून बाहेर पडणार्‍या ‘रेडिएशन’मुळे घडल्याचा निष्कर्ष काढला आहे.

सारी दुनिया सध्या अतिवेगवान ५-जी नेटवर्कच्या प्रतीक्षेत असून जगात काही ठिकाणी या नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत. त्या दरम्यान या नेटवर्कमधील काही दोष नजरेस येऊ लागले आहेत. बार्सिलोनात होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन, ईटीएच झुरिक, नॉर्वेच्या सिन्तेफ डिजिटल रिसर्च आदी संस्थेच्या संशोधकांनी आपले अहवाल सादर केले आहेत. यामध्ये संशोधकांनी ‘५-जी’ नेटवर्कमुळे होणार्‍या रेडिएशनमुळे पक्षी, लहान कीटक यांच्या जीवाला धोका निर्माण होणार असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे या धोक्यांवर मात करण्यासाठी सध्या संशोधन सुरू असल्याचे समजते.

काही कंपन्या लवकरच बार्सिलोना येथे होणार्‍या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये‘ ५-जी’ या वेगवान नेटवर्कला सपोर्ट करणारे मोबाईल सादर करत आहेत. मात्र, याचवेळी या नेटवर्कमुळे होणारे संभाव्य धोकेही या घटनेने दिसून येत आहेत.

संपूर्ण जगाला सध्या ‘४ -जी’ नंतर आता ‘५-जी’ नेटवर्कची प्रतीक्षा लागून राहिली आहे. अनेक देशांमध्ये ‘५-जी’ नेटवर्कच्या चाचण्यांना सुरुवातही करण्यात आली आहे. मात्र, चाचण्यांना सुरुवात होताच  या नेटवर्कमधील दोषही दिसू लागले. यामुळे हे नेटवर्क पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.