‘RTO’ परमीटसाठी बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीतील 5 जण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – वाहनांच्या परिमिटसाठी ‘आरटीओ’ला लागणारी कागदपत्रे बनावट तयार करुन हजारो रूपये उकळण्याच्या राजरोसपणे सुरु असलेल्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. पाच जणांना अटक करुन बनावट प्रमाणपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पासपोर्ट अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मंगळवारी भोसरी, एमआयडीसी परिसरात छापा टाकून ही कारवाई करण्यात आलेली आहे.

या प्रकरणी पासपोर्ट निरीक्षक सुनील पिंजण यांनी फिर्याद दिली आहे. तर अशोक भीमराव जोगदंड (37, रा. निगडी), बालाजी अशोक माशाळकर (40, रहाटणी, काळेवाडी), सचिन महादु साळवी (35, रा. रुपिनगर, निगडी), मुकुंद दत्तू पवार (30, निगडी), रामदास मछिंद्र हानपडे (35, चिखली) या पाच जणांना अटक केली आहे तर त्यांचे चार साथीदार अद्याप फरार आहेत.

वाहन चलविण्यासाठी चालकाला आरटीओमधून परमिट काढावे लागते. यासाठी त्या वाहन चालकाचे चारित्र्य तपासणी प्रमाणपत्र पोलिस देत असतात.

अटक केलेले पाच जण आणि त्यांचे साथीदार हे आरटीओत एजंट म्हणून काम करतात. या सर्वांनी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या नावाने अनेक वाहन चालकांना बनावट प्रमाणपत्र दिले. तीच प्रमाणपत्रे परमिटसाठी आरटीओ कार्यालयात जमा केली. याबाबत पासपोर्ट अधिकारी सुनील पिंजण यांना माहिती मिळाली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम तांगड़े यांच्या पथकासोबत मोशी येथील आरटीओ कार्यलयाशेजारी छापा टाकून पाच जणांना अटक केली. तसेच मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे कोठून तयार केली जातात, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, कोण कोणत्या स्वरुपाचे प्रमाणपत्र तयार केली आहेत आणि फरार आरोपींचा शोध पोलिस पथक घेत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –