जाणून घ्या दह्यात गूळ मिसळून खाण्याचे ‘हे’ 5 आरोग्यदायी फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केसातील कोंड्यापासून तर त्वचा कोमल होण्यापर्यंत दह्याच्या सेवनाचे आपल्याला अनेक फायदे होतात. दह्यात गूळ टाकूनही तुम्ही त्याचं सेवन करू शकता. किंवा लस्सीच्या रुपात जर त्याचं सेवन केलं तर सौंदर्याला मोठा फायदा होतो. दह्यात गूळ मिसळून खाल्ल्यानं शरीराला कोणते आरोग्यदायी फायदे होतात. याच फायद्यांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) शरीरातील रक्ताची समस्या दूर होते – अनेकांच्या शरीरात रक्ताची कमतरता जाणवत असते. दही आणि गूळ यांच्या या घरगुती उपायानं देखील तुम्ही ही समस्या दूर करू शकता. यासाठी रोज दही खाताना त्यात गूळ मिसळून त्याचं सेवन करावं. नियमित याचं सेवन केलं तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल.

2) सर्दी-खोकला दूर होतो – पावसाळ्यात किंवा पाण्यात बदल झाला तर अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवतो. गुळात असणाऱ्या लोह, मिनरल्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, सेलेनियम, मँगनीज आणि कॉपरसारख्या तत्वांमुळं अनेक आजार नाहीशे होतात. सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर दही आणि गुळाच्या मिश्रणात काळी मिर्ची पावडर टाकून मिश्रण तयार करा. या मिश्रणाचं सेवन केलं तर सर्दी-खोकला नाहीसा होईल.

3) पचनक्रिया सुधारण्यास मदत – गुळात असणाऱ्या पोषकतत्वांमुळं पचनक्रियेसंदर्भातील आजार सुधारण्यास मदत होते. गुळामुळं पचनक्रिया सुलभरित्या होते आणि पोटात गॅस निर्माण होत नाही. खास करून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये होणाऱ्या पोटाच्या समस्या गूळ आणि दह्यानं कमी होतात. रोज जर याचं सेवन केलं तर पोटाचे विकार दूर होतात.

4) मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी होतात – मासिक पाळीत येणारे क्रेम्प्स आणि वेदना दही आणि गुळाच्या सेवनामुळं कमी होतात. जर तुम्हाला किंवा घरातील महिलांना असे त्रास होत असतील तर ते दही आणि गुळाचं सेवन करू शकतात.

5) वजन घटवण्यास मदत होते – गूळ रासायनिक प्रक्रियांविना तयार केला जातो. त्यामुळं त्याचाही शरीराला खूप फायदा होतो. म्हणूनच गूळ साखरेपेक्षा जास्त पोषक आहे. त्यामुळं रोज दह्यासोबत गुळाचं सेवन करावं.

दह्याचे दु्ष्परिणाम –
– गोड किंवा गोड आंबट असं ताजं दही जर खाल्लं तर शरीराला बाधत नाही. परंतु शिळं, अतिआंबट, रात्रीच्या वेळी जर त्याचं सेवन केलं तर अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.

– दह्यामुळं श्वसनमार्गाचे अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. जसे की, दमा, खोकला, सर्दी, पडसं, फ्लू, आम्लपित्त. या काळात शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. अतिआंबट दह्यामुळं ती अजूनच कमी होते. म्हणून थंड, आंबट आणि बाहेरचे दही या ऋतुत खाऊ नये. दही खायचेच असले तर मधुर ताजं, दही दुपारच्या वेळी खावं. तुम्ही दह्याचं ताक करूनही त्याचं सेवन करू शकता.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल ॲडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची ॲलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला ॲलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.