छत्तीसगडमध्ये माओवाद्याच्या हल्ल्यात 5 जवान शहीद, 12 जण जखमी

छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झाले असून 12 जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शहीद झालेल्यामध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा जवानाचा समावेश आहे. तर जखमी जवानांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर या चकमकीत एका माओवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापुर जिल्हयातील जुनागडच्या जंगलात गेल्या दोन तासांपासून सुरक्षा दलाचे जवान आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू आहे. बिजापुर आणि सुकमा जिल्हयाच्या सीमेवर ही चकमक अजुनही सुरू असल्याचे सांगितले जात आहे.