ब्रेकिंग : IMA घोटाळ्यामध्ये 5 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर FIR, 2 IPS ऑफिसरचा समावेश

नवी दिल्ली, वृत्तसंस्था –  कर्नाटकात गाजत असलेल्या हजारो कोटी रूपयांच्या आयएमए घोटाळ्या प्रकरणात दोन IPS अधिकाऱ्यांसह 5 पोलीस अधियाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएस हेमंत निंबाळकर अजय हिलोरी यांच्यासहीत तीन इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांवर या घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मन्सूर खान याला मदत केल्याचा आरोप आहे.

एका हिंदी वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक पोलीस अधिकाऱ्यावर नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 1998 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले हेमंत निंबळकर आणि 2008 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अजय हिलोरी यांच्या या घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर कर्नाटक पोलिसांनी या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेमंत निंबाळकर हे बंगलोर शहर एसीपी आहेत तर हिलोरी हे कर्नाटक राज्य राखीव पोलीस दलात कमांडंट आहेत. आयएमए घोटाळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयाने यापूर्वी कर्नाटक सरकारला या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केले होती. या दोन आयपीएस अधिकाऱ्यांसोबत सीबीआयने तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गौरी शंकर, पोलीस उप अधीक्षक आणि तत्कालीन सीआयडीमध्ये कर्यरत असणारे ईबी श्रीधरा आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक एम रमेश यांचा समावेश आहे.

या पोलीस अधिकाऱ्यांव्यतिरीक्त सीबीआयने आयएमए घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार मन्सूर खान आणि इतर ती आयएमए अधिकाऱ्याची नावे घोटाळ्यात समाविष्ट केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, या घोटाळ्याच्या चौकशीमध्ये दोन आयपीएस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.