सोलापूर : देवदर्शनावरून परत येताना भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यु

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देवदर्शनावरुन परत येत असताना गुलबर्गाजवळ झालेल्या अपघातात दक्षिण सोलापूरातील चदचणे कुटुंबातील ५ जणांचा मृत्यु झाला. हे सर्व जण दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूरचे रहिवासी आहेत. अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथे झाला.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर येथील चदचणे कुटुंबिय श्रावण सोमवारनिमित्त दक्षिण भारतात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन ते परत येत असताना आळंद गावाजवळ त्यांच्या स्काॅर्पिओची कंटेनरला धडक बसली. धडक इतकी भीषण होती की स्काॅर्पिओचा चक्काचूर झाला आहे. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यु झाला. तिघे जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त समजताच चिंचपूर गावावर शोककळा पसरली असून गावातील प्रमुख घटनास्थळी रवाना झाले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –