बाबो ! 25 सेकंदात 5 Kiss, दाम्पत्यांमध्ये रंगली अनोखी स्पर्धा, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आत्तापर्यंत अनेक स्पर्धा तुम्ही पाहिल्या असतील किंवा स्पर्धांमध्ये भाग देखील घेतला असेल. मात्र, आजपर्यंत तुम्ही विचित्र स्पर्धा विषयी वाचले असेल किंवा ऐकले असेल. परंतु सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. ही स्पर्धा आहे Kissing स्पर्धा. ज्या प्रमाणे एखाद्या स्पर्धेत एका कोपऱ्याला ठेवलेली वस्तू धावत जाऊन घ्यायची आणि दुसऱ्या दिशेला पोहोचवली जाते. त्या प्रमाणे एका दिशेला बसलेल्या नवऱ्याच चुंबन घेऊन दुसऱ्या बाजूला धावत जायचं, अशा या स्पर्धेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरु आहे.

एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये महिला धावत जाऊन आपल्या पतीचं चुंबन घेतात. 30 सेकंदात पाच वेळा किस अशा प्रकारे जो कमी वेळात जास्त वेळा चुंबन घेईल, ते दाम्पत्य विजयी, अशी ती स्पर्धा असल्याचे सांगितले जातेय. याशिवाय आजूबाजूला लोक हसत-खेळत स्पर्धकांचा उत्साह वाढवत आहेत. तसेच आजूबाजूला लहान मुलांपासून मोठ्यांचाही समावेश आहे.

सर्वसाधारणपणे आपल्या पतीच्या जवळ जायला संकोच करणाऱ्या महिला आपण पाहतो. मात्र, या स्पर्धेत महिला सर्वांसमोर पतीचं चुंबन घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एकाने तर या इम्रान हशमी चुंबन चषक अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर अनेकांना ही स्पर्धा पाहून आश्चर्य वाटत आहे. ही स्पर्धा देशात नेमकी कोणत्या भागात झाली याची नेमकी माहिती मिळू शकली नाही. मात्र, या स्पर्धेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.