5 लाखाच्या लाचेचं प्रकरण ! सहाय्यक निरीक्षक अन् कर्मचार्‍याच्या जामीनावर झाला ‘हा’ निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील नारायण गाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांनी 5 लाख रुपयांची लाच मगितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल करुन अटक केली. या दोघांना आज खेड न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश अंबळकर यांनी या दोघांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील (वय 38) आणि पोलीस नाईक धर्मात्मा कारभारी हांडे (वय 37) असे लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.

अर्जुन घोडे पाटील हे पुणे ग्रामीण पोलीस दलात सहायक निरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत. त्यांना नारायण गाव पोलीस ठाण्याचा चार्ज देण्यात आला होता. तर हांडे हे येथे कर्व्यव करत होते. दरम्यान तक्रारदार यांचे विरोधात नारायणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्हयातील दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी मदत करून नमूद गुन्ह्यात इतर दोन आरोपीने अटक न करण्या साठी हांडे यांनी सहायक निरीक्षक घोडे पाटील यांना पैसे देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख रुपयांची स्पष्ट लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडे पाटील आणि हांडे या दोघांना आज खेड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 25 हजार रुपयांच्या जामीनावर त्यांची मुक्तता केली. आरोपी यांच्यतर्फे ॲड. प्रताप परदेशी, महेश राजगुरु व सुहास कोल्हे यांनी काम पाहिले.