खळबळनजक ! पुण्यात नोटाबंदीदरम्यान बॅंकेत जमा केल्या ५ लाख ९४ हजारांच्या बनावट नोटा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहिर केल्यानंतर चलनातील जुन्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वांनी घाई केली. मात्र पुण्यात या घाई गडबडीचा फायदा घेत टिळक रस्त्यावरील युनीयन बँक ऑफ इंडीयामध्ये काही जणांनी चक्क ५ लाख ९४ लाख रुपयांच्या बनावट नोटाच बँकेत जमा केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०१६ मध्ये घडला आहे.

याप्रकऱणी बँकेचे व्यवस्थापक रोहनकुमार सिंग यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

काय घडलं ?
नोटा बंदीदरम्यान नोव्हेंबर २०१६ मध्ये शाखेत एका ग्राहकाने चलनातील बाद झालेल्या नोटा बदलून घेण्यासाठी जुन्या एक हजार रुपये आणि पाचशेच्या नोटा दिल्या. त्याने एकूण ५ लाख ९४ हजार रुपये बँकेत जमा केले.

असा उघडकिस आला प्रकार
बँकेमध्ये नोटाबंदीच्या काळात सहाशे कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर ही रक्कम आरबीआयच्या नोटा छपाई करणाऱ्या बदलापूर येथील कारखान्यात पाठवून देण्यात आली. तेथे नोटांची तपासणी केल्यावर या नोटा बनावट असल्याचे समोर आले.

प्रकार समोर आल्यानंतर रोहनकुमार यांनी यासंदर्भात ग्राहकाविरोधात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गभाले करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
मोदींनी केला ‘शशांकासन’ चा व्हीडिओ शेयर
रक्तदानामुळे शारीरीक आणि मानसिक आरोग्य राहते चांगले
घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी