देशातील ५ लाख गावं हागणदरीमुक्त : नरेंद्र मोदींचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

उघड्यावर बसणाऱ्यांची संख्या ४० टक्यांनी घटली असून ५ लाख गावं हागणदरीमुक्त झाल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता’ संमेलनात बोलत होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’159c3254-c63e-11e8-9a15-990713710a8c’]

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, भारतातील स्वच्छता अभियान हे जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान आहे. स्वातंत्र्य आणि स्वच्छता यामध्ये गांधीजींनी स्वच्छतेला प्राधान्य दिले होते. तसेच स्वच्छतेच्या कामाबाबतीत सरकारी कार्यालयांत बाबूगिरी चालणार नाही. तर गांधीगिरी चालेल, असं ते म्हणाले.

पूर्वी उघड्यावर प्रात:विधी करणाऱ्यांमध्ये जगभरातील लोकसंख्येच्या ६० टक्के लोक भारतात होते. मात्र आता ही संख्या तब्बल २० टक्यांनी घटली आहे. मागिल चार वर्षांमध्ये जेवढी शाैचालये बनली त्यांपैकी ९० टक्के शाैचालयांचा नियमितरित्या वापर झाला आहे. लोकांनी पून्हा जुन्या सवयींकडे वळू नये यासाठी सरकार खबरदारी घेत असल्याचेही मोदी यांनी सांगितले. २०१४ पूर्वी देशातील ग्रामीण स्वच्छता केवळ ३८ टक्के होती. आता ती ९४ टक्के झाली आहे. फक्त चार वर्षांत हा फरक पडला आहे. तसेच देशातील १२५ कोटी लोक स्वच्छता अभियानात सहभागी झाल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

कपड्यापासून सूत बनविणारे ‘महात्मा मोदी’, राज ठाकरेंचे व्यंगचित्र

मोदींचा भारतीय जनतेसाठी फोर-पी मंत्र

यावेळी मोदींनी फोर-पी मंत्रही दिला. पब्लिक फंडिंग, पॉलिटिकल लिडरशीप, पार्टनरशीप आणि पीपल्स पार्टिसिपेशन या फोर-पीमुळे स्वच्छता अभियान अधिक यशस्वी होणार आहे. हा मंत्र सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B0756Z43QS,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c2cc49bf-c63e-11e8-8eca-87780806df1f’]

जाहीरात