तुम्हालाही श्रीमंत व्हायचंय ? मग लक्षात ठेवा मुकेश अंबानींच्या ‘या’ ५ टिप्स

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कुणालाही यश सहजासहजी मिळत नाही. प्रत्येकाला या यशासाठी काही किंमत चुकवावी लागते. आशियातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी देखील काही एका दिवसात श्रीमंत झालेले नाहीत. त्यामागे त्यांचे प्रचंड कष्ट आणि जिद्द आहे. तर चला पाहुयात त्यांच्या या यशाचे रहस्य काय आहे ?

१) एक चांगली टीम

एका उत्तम टीमशिवाय आपण काहीही करू शकत नाही, म्हणून चांगल्या लोकांबरोबर काम करणे आणि कठोर परिश्रम करणे, यश मिळवण्यासाठी फार महत्वाचे आहे.

२) नेहमी सकारात्मक राहा 

आपण वाचन केले काय किंवा काम केले काय सतत सकारात्मक राहणे महत्वाचे आहे. आपण या पद्धतीने काम केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळेल. बरेच नकारात्मक लोक तुमच्या अवतीभवती असतील परंतु तुम्ही सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

३) अपयशाला घाबरू नका, त्यातून शिका, कधीही हार मानू नका

आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला यश आणि अपयशाचा सामना करावा लागतो म्हणून, अपयशाची भीती बाळगू नये. त्याऐवजी त्याचा सामना करायला शिकावे. यशस्वी होण्यासाठी सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी या मागचा आपला उद्देश काय आहे हे माहित असणे आवश्यक आहे. तरच आपण ध्येय गाठू शकता. लक्ष्य तयार करून न चालल्याने काहीही सध्या होत नाही.

४) स्वप्ने आणि विचार मोठे ठेवा

मोठी स्वप्न बघण्याची प्रेरणा मुकेश अंबानी यांना आपले वडील धीरूभाई अंबानी यांच्याकडून मिळाली. केवळ ५०० रुपयांचा फोन तयार करून, अंबानी कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीस मोबाइल दिला. यामुळेच अंबानी हे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. आयुष्यात जर काही मोठं करायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने प्रथम आपल्या विचारांची व्याप्ती वाढवली पाहिजे.

५) घाबरू नका, धैर्याने काम करा

लहानपनीच मुकेश अंबानी आपल्या वडिलांच्या व्यवसायात उतरले. व्यवसायातल्या सर्व बारीक सारीक गोष्टी जाणून घेण्याआधीच काका रसिकभाई आणि वडील धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. पण मुकेश अंबानी यांनी न घाबरता हा व्यवसाय वाढवला. त्यांनी केवळ वडिलांचा व्यवसाय सांभाळलाच नाही तर तो वाढवला देखील.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like