भारताने जिंकलेला ‘तो’ विश्वचषक फिक्स होता ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. भारतीयांनी रात्रभर या विजयाचा जल्लोश केला होता. तब्ब्ल २८ वर्षाने भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते परंतु आता याच विश्वचषकातील पाच सामने फिक्स असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ‘क्रिकेट के मैच फिक्सर्स: द मुनवर फाइल्स’  या डॉक्यूमेंट्रीत या प्रकरणाविषयी भाष्य करण्यात आले आहे.
एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने ५४ मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री बनवली आहे. यामध्ये भारतामध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये स्पॉट फिक्संग झाल्याचे या डॉक्यूमेंट्रीमध्ये सांगण्यात आले आहे.  ‘क्रिकेट के मैच फिक्सर्स: द मुनवर फाइल्स’ असे या डॉक्यूमेंट्रीचे नाव आहे. २०११  साली झालेल्या विश्वचषकातील पाच आणि २०१२ साली झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचेही या डॉक्यूमेंट्रीमध्ये म्हटले गेले आहे.
आयसीसी करणार चौकशी –
स्पॉट आणि मॅच फिक्सिंगचे आरोप झाल्यावर क्रिकेट विश्‍व ढवळून निघाले आहे. आयसीसीनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
आयसीसीकडून गांभीर्याने दखल
२०११ आणि २०१२ दरम्यान जवळपास १५ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये किमान फिक्सिंग करण्यात आल्याचा दावा एका वृत्तवाहिनीने केल्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेटवर्तुळात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळातील भ्रष्टाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे म्हणत या वृत्तवाहिनीकडे व्हिडीओ चित्रण मागितले असून त्यांनी हे चित्रण आयसीसीला देण्यास नकार दिला आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे महाव्यवस्थापक अ‍ॅलेक्स मार्शल यांनी सांगितले, ‘वाहिनीने इंटरपोल किंवा अन्य पोलिस यंत्रणांच्या मदतीने हे चित्रण आम्हाला दिले तर दोषींवर कारवाई करण्यात मदत होईल. आम्ही हे आरोप अतिशय गंभीरतेने घेत असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. क्रिकेटमधून भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी आमच्याकडे पूर्वीपेक्षा अधिक चांगली यंत्रणा उपलब्ध आहे.’
विराट, रोहितही फिक्सिंगच्या जाळ्यात ?
आयसीसीच्या ‘रडार’वर  मुनवर नावाचाच्या  एक मॅच फिक्सर आहे. या मुनवरने २०११  साली लॉर्डस्वर झालेल्या कसोटी सामन्यात फिक्सिंग झाल्याचे सांगितले आहे. या मुनवरबरोबर विराट आणि रोहित यांचे संबंध असल्याचेही पुढे आले आहे.
इंग्लंड, ऑस्ट्रेलियाकडून आरोपाचे खंडन
आपले खेळाडू कोणत्याही गैरकृत्यात सहभागी झालेेले नाहीत, असे म्हणत इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पॉट फिक्सिंगचा आरोप फेटाळला आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंबरोबरच नाव न सांगता ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानच्या खेळाडूंवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अत्यंत तुटपुंजी माहिती देण्यात आली आहे. आरोपाबाबत कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही, असे ईसीबीने म्हटले आहे. इंग्लंडच्या खेळाडूंच्या वर्तणुकीबाबत कुठलाही संशय घ्यायला जागा नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही ईसीबीने दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पथकानंही या दाव्यासंदर्भात तपासाची भूमिका घेतली आणि यादरम्यान आम्हाला आक्षेपार्ह असे काहीही आढळले नाही. कुठलाही ठोस पुरावा नसताना खेळाडूंकडे संशयाच्या नजरेने पाहणे आता बस्स झाले, असेही वैतागून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चिफ एक्झिक्युटिव्ह अ‍ॅलिस्टर निकोलसन यांनी म्हटले आहे.

जाहिरात