पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा नियमित ‘असे’ काही

पुणे : पोलासनामा ऑनलाइन – एक्सरसाइज ही वजन कमी करण्यासाठी नसून फिट आणि हेल्दी राहण्यासाठी असते. परंतु, अनेकजण केवळ वजन कमी करण्यासाठी ती करतात. एक्सरसाइज हेल्दी राहण्यासाठी केल्यास आपोआपच वजन नियंत्रणात राहील. पोटावर चरबी जमा झाली असेल तर डायबिटीज व हृदयरोगांचीही समस्या होऊ शकते. ही चरबी कमी करण्यासाठी केवळ ५ मिनिटांचे वर्कआऊट केल्यास बाहेर आलेले पोट कमी कमी होऊ शकते.

बायसिकल क्रंच ही चांगली एक्सरसाइज आहे. यामुळे पोटाच्या अ‍ॅब्ससह पोटाच्या दोन्ही बाजूने असलेल्या मांसपेशींनाही व्यायाम मिळतो. अ‍ॅब्डॉमिनिल मांसपेशी म्हणजेच पोटाच्या मांसपेशीचा चांगला वर्कआउट होऊन पोटावरील चरबी कमी होते. पायांना गुडघ्यापासून मोल्ड करुन जमिनीवर पाठिवर झोपा. दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा. पोट आत करा आणि खांदे जमिनीवरुन वर उचला आणि गुडघे छातीच्या जवळ आणा. ही एक्सरसाइज पुन्हा पुन्हा करा.

जलदगतीने पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी ३ वेळी ही एक्सरसाइज केली पाहिजे. १० ते १२ वेळा ही एक्सरसाइज सतत करा. जर मानेची किंवा पाठिची कोणतीही समस्या असेल तर ही एक्सरसाइज करु नये. तसेच एक्सरसाइज करण्यापूर्वी डॉक्टरांनी किंवा फिजिकल थेरपिस्टचा सल्ला जरूर घ्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like