पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे 5 नायजेरियन आढळले, सर्वत्र खळबळ

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात ड्रग्स विक्रीत अग्रेसर असणार्‍या नायजेरियन नागरिकांची पुण्यात चांगलीच चंगळ सुरू असून, गुन्हे शाखेने केलेल्या विशेष मोहिमेत इनलिगल राहणारे पाच नायजेरियन सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्यांना गुन्हे शाखेने पकडून पुन्हा मायदेशी पाठविण्याची प्रोसेस सुरू केली आहे. त्यात दोन महिला अन तीन पुरूषांचा समावेश आहे.

केहिंद केटरिना व नामायोम्बा रिताह अशी महिलांचे नावे असून, पुरूषांमध्ये टोनी अ‍ॅडजेमीओ, इक्वर जॉर्ज ओसारमेन तसेच दाईक चिडीएमेरे समावेश आहे. पाचही जणांना विशेष सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरात अमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कामगारांत गांजा अन अतिउच्चभ्रुमध्ये कोकेन, ब्राऊन शुगर अशा अमली पदार्थांची चलती आहे. कधी तरी पोलीसांची होणारी कारवाईनंतर काही महिने थंडावते. त्यांना कोणी सापडतच नाही. पण, विक्री मात्र थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिसांची जाळे कमी पडत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, थर्टीफस्टनिमित्त गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहित, मिलींद गायकवाड तसेच पथकाने दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत शहरातील काही भागात चेकींग करण्यात आली. त्यावेळी पोलिसांना कोंढवा परिसरातील स्काय हाईट्स इमारतीत काही नायजेरियन राहत असल्याचे समजले. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून त्यांची झडती घेतल्यानंतर ते इनलिगल रित्या पुण्यात वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात येत असून ते कधी आले आणि पुण्यात नेमके काय करत होते याची माहिती मात्र, मिळू शकलेले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?

You might also like