‘या’ ५ ऑनलाईन गेम पासून जीवाचा ‘धोका’ ; लक्ष ठेवा ! आपले मूल तर नाही ना त्याच्या ‘जाळ्यात’

पोलिसनामा ऑनलाईन टीम : आपल्याकडे एक काळ असा होता जेव्हा मुलांना बाहेर खेळायला जाताना बंधने घातली जायची. दिवसभर मैदानावर घालविल्यामुळे आई वडिल मुलांना ओरडत असत. आता मात्र परिस्थिती बदलली असून मुलांना मैदानावर खेळायला पाठविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते तरीदेखील मुले घराबाहेर पडायला तयार होत नाहीत. याचे सर्वात मोठे कारण स्मार्टफोन आणि ऑनलाईन व्हिडिओ गेम हे आहे.

ऑनलाइन व्हिडिओ गेमिंग चा बाजार आणि वापर जसा वाढत आहे तसेच त्याच्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. काही व्हिडिओ गेम्स मुलांसाठी अत्यंत धोकादायक असून मुलांवर नकारात्मक प्रभाव पडत आहेत, त्यांना हिंसक बनवत आहेत, इतकेच नाही तर त्यांना आत्महत्या करण्यास देखील प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे व्हिडिओ गेम च्या नादात मुले मृत्युमुखी पडलेल्या घटनांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

अशाच काही घातक गेम्स विषयी जाणून घेऊ :

१) ब्लू व्हेल :
या गेम चे नाव आपण नक्कीच ऐकले असेल. २०१७- १८ मध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या या गेममध्ये दिले जाणारे टास्क पूर्ण करण्याच्या नादात कित्येक मुलांनी आत्महत्या केली आहे. २०१७ या वर्षात या गेममुळे रुसमध्ये १३०हुन अधिक तर भारतात जवळपास १०० मुले मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे या गेमचा निर्माणकर्ता फिलिप बुदेकिन (Phillip Budeikin) याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस चौकशीत त्याने सांगितले कि विशेषतः ज्या लोकांना जगण्याची इच्छाच राहिली नाही त्या लोकांसाठीच हि गेम बनवली गेली होती.

ब्लू व्हेल गेम दिले जात होते असे ‘टास्क’ :
अ) वेकअप अ‍ॅट ४:३० मॉर्निंग- सकाळी लवकर उठून भयपट म्हणजे ‘हॉरर मूव्ही’ पाहणे.
ब) हातावर ब्लेड ने ब्लू व्हेल बनवणे.
क) हाताची नस कापणे.
ड) छतावरून उडी मारणे
इ) संगीत ऐकणे : गेम खेळणाऱ्याला ऐकण्यासाठी असे संगीत दिले जायचे जे त्याला आत्महत्या करण्यासाठी उद्युक्त करील.
ई) सुसाइड – गेम च्या ५०व्या म्हणजे शेवटच्या टास्क मध्ये त्याला आत्महत्या करण्यासाठी टास्क दिले जायचे.

२) पास आउट चॅलेंज :
चोकिंग गेम (Choking Game) नावाने देखील ओळखली जाणारी हि गेम मुलांमध्ये लोकप्रिय होती. यात एका वेळी २-३ मुले हि गेम खेळत आणि शेवटी एकमेकांचा गळा दाबत असत. त्यामुळे ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे मुले मृत्युमुखी पडत. कित्येकदा मुले बेशुद्धदेखील पडत असत. मीडिया रिपोर्ट्स नुसार अमेरिकेमध्ये या गेम मुळे दरवर्षी १००० मुलांचा मृत्यू होतो. मुलांच्या हालचालींवरूनदेखील अशा मुलांची ओळख पटते. जसे कि मान झाकून वावरणे, मानेवर एखादे चिन्ह असणे, इत्यादी लक्षणे दिसत असतील तर अशा मुलावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

३) PUBG मोबाइल :
प्लेयर्स अननोन बॅटल ग्राउंड (Players Unknown Battle Ground) असा या लोकप्रिय गेम चा फुलफॉर्म असून भारतात या गेमवर बंदी आणावी अशी मागणी जोर धरत आहे. अत्यंत कमी वेळात लोकप्रिय झालेल्या या गेम वर गुजरातमध्ये एका महिन्यासाठी बंदीदेखील घातली होती. या काळात गेम खेळणाऱ्या १६ लोकांना अटकदेखील झालेली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पबजी गेम मुळे युवकांवर गंभीर मानसिक परिणाम होत असून मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती वाढत आहे. याच वर्षी सलग ६ तास पबजी खेळल्यामुळे मध्यप्रदेश येथील युवकाचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला होता.

४) सॉल्ट अँड आईस चॅलेंज :
हा गेम सुद्धा ब्लू व्हेल सारखा स्वतःला इजा पोहोचवणारा आहे. यात मुलांना एक टास्क दिले जाते ज्यानुसार शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर मीठ ठेऊन त्यावर बर्फ ठेवायला सांगितले जाते. त्यामुळे बर्फ वितळून ती जागा जळते. या गेम मुळे कित्येक मुलांचे हात जळाले आहेत किंवा गंभीर इजा झाली आहे.

५) द फायर चॅलेंज :
गेम च्या नावाप्रमाणेच यामध्ये अत्यंत घातक असे टास्क मुलांना दिले जाते. प्लेअर ला शरीरावर पेट्रोल सारखे ज्वलनशील पदार्थ लावून आग लावायला सांगितले जाते आणि विडिओ तयार करायला सांगितले जाते. हि गेम खेळताना अनेक मुलांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क मध्ये १५ वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू ही गेम खेळताना गंभीर भाजल्यामुळे झाला होता. त्यानंतर या गेम ची घातकता समोर आली होती.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

Video : ‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीने घेतले ‘ते’ इंजेक्शन ; व्हिडीओ सोशलवर ‘चालतो’ नव्हे ‘पळतो’