जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांना अटक

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

शहर पोलिस दलातील गनमॅन शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र उर्फ जितु जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी समर्थ पोलिसांनी 5 जणांना सोमवारी अटक केली आहे. त्याबाबतची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

विनोद भोळे, सुधीर सुतार, अमित तनपुरे, अतुल पवार आणि विशांत कांबळे असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जितेंद्र जगताप यांनी शनिवारी दुपारी हडपसर रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे गाडी समोर उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्येपुर्वी सुसाईड नोट लिहीली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दिपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी आणि इतरांची नावे होती. याप्रकरणी सर्वप्रथम लोहमार्ग पोलिस ठाण्यात दिपक मानकर आणि इतरांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी प्रकरण समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सोमवारी सकाळी पाच जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले 5 जण हे दिपक मानकर यांच्याकडे कामाला आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे.

आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकीविरूध्द गुन्हा 

गनमॅन शैलेश जगताप यांच्या भावाची आत्महत्या