पुणे : सारसबागेत झाड कोसळून एकाच कुटुंबातील ५ जण जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बाहेरगावाहून पुण्यातील प्रसिद्ध सारसबाग पाहण्यासाठी एक कुटुंब आले होते. तेथील हिरवळीवर ते बसले असताना झाड कोसळून त्यात कुटुंबातील पाच जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली.

निकिता नितीन बत्तेल्लू (वय २४), नेहा बत्तेलू, प्रसाद बत्तेल्लू (वय २१) आणि ओम गणेश दुभाष (वय ११ रा. कॅम्प), मानसी पेटा (वय १५), महेश पेटा (वय ३८, रा. अहमदनगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मुलांना सुट्ट्या लागल्या असल्याने अनेक कुटुंब सहपरिवार सहलीला जात असतात. बत्तेल्लू कुटुंबिय बुधवारी दुपारी सारसबागेत आले होते. बागेत फिरल्यानंतर ते सिद्धीविनायक मंदिराजवळील हिरवळीवर बसले. ओम आणि मानसी हे खेळत होते. त्याचवेळी शेजारी असलेले जुने गुलमोहराचे झाड अचानक उन्मळून पडले. काही कळायचा आत तेथे बसलेल्या या दोन कुटुंबं त्या झाडाखाली सापडले. निकिता हिच्या डोक्याला मार लागला. झाड पडल्याचा आवाज ऐकून बागेतील लोक धावून आले. त्यांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. त्यांच्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like