‘ते’ 5 पोलीस नसते तर मोठा ‘अनर्थ’ घडला असता..

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव हे तसे सुशिक्षित गाव या गावची लोकसंख्या जवळपास वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे. केडगाव बाजारपेठ ही मोठी आर्थिक उलाढाल असणारी बाजार पेठ म्हणून तिची ओळख असून या गावची ओळख ही शांत आणि सय्यमी गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आहे. पण याच केडगावमध्ये गाडी मागेपुढे घेण्याचा किरकोळ कारणावरून एका व्यापाऱ्याला काही तरुणांनी मारहाण केल्याने केडगाव मधील परिस्थिती चिघळली. केडगावमधील व्यापारी आणि ग्रामस्थांनी या मारहाणीचा निषेध म्हणून फेरी काढून ग्रामपंचायतीसमोर निषेध सभा घेतली. तेवढ्यात काही युवक हे एका चारचाकी गाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या डाव्या बाजूला आले.

काल व्यापाऱ्याला मारहाण करणारे यातील काही आहेत हा समज होऊन निषेध सभेतील तरुण आणि या युवकांमध्ये मारहाण सुरू झाली आणि पाहता-पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली. दोन्ही कडून शेकडो युवकांचा जमाव केडगाव स्टेशन बाजारपेठेत जमला. एका जमावाने हातात टिकाव, खोऱ्यांचे दांडे तर दुसऱ्या जमावाने हातात दगड घेऊन एक दुसऱ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असताना केडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, हवालदार जितेंद्र पानसरे, पो.ना. दादा दराडे, बाळासाहेब चोरमले, तात्या कऱ्हे यांना याची भनक लागली आणि या पाच पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती ओळखून तत्परतेने जमावाला पांगविण्यास सुरुवात केली. एक जमाव दुसऱ्या जमावावर हल्ला करण्यासाठी जात असताना त्या जमावाला पो.ह.जितेंद्र पानसरे आणि दादा दराडे यांनी थोपवण्याचा प्रयत्न केला तर तो पर्यंत चौकात उभ्या असलेल्या दुसऱ्या जमावास सपोनि धनंजय कापरे, बाळासाहेब चोरमले, तात्या कऱ्हे यांनी पांगविण्यास सुरुवात केली दुसरा जमाव पांगताच समोरील जमावाने उग्ररुप धारण करत काहींवर हल्ला केला.

दोन्हीकडील चाल करून आलेल्या तीनशे ते चारशेच्या जमावाला केवळ हे पाच पोलीस मोठ्या शिताफीने कंट्रोल करत होते. इतक्या मोठ्या जमावताही या पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावून परिस्थिती नियंत्रांमध्ये ठेवली होती. ही बाब यवत पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना समजताच त्यांनी जास्तीची कुमक घेऊन थेट केडगाव पोलीस चौकी गाठली आणि जमावाला पांगविण्याचे आदेश दिले.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like