डोळे नेहमीच सुजलेले दिसतायत ? जाणून घ्या ‘ही’ 5 ‘कारणं’ आणि सोपे ‘उपाय’ !

पोलिसनामा ऑनलाइन – अनेकांना झोपेतून उठल्यानंतर डोळे सुजलेले वाटतात. खास करून महिलांचा लुक यामुळं बिघडतो आणि यासाठी त्या मेकअपचा आधार घेतात. या सुजलेल्या डोळ्यांची पफी आईज असंही म्हटलं जातं. याची काही कारणं आणि घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.

1) भरपूर झोप – एका व्यक्तीनं किमान 6-7 तास तरी शांत आणि पूर्ण झोप घेणं गरजेचं असतं. जर तुमची झोप झाली नाही तरीही तुम्हाला ही समस्या येऊ शकते.सोबतच काळी वर्तुळंही दिसू शकतात. यासाठी चांगली झोप घ्या.

2) भरपूर पाणी प्यावं – शरीरात पाण्याची कमतरता असेल तरीही डोळ्यांखाली सूज येते. यासाठी सकाळी उठल्यानंतर किमान 2 तास नॉर्मल पाणी प्यावं. रात्री झोपण्यापूर्वी देखील पाण्याचं सेवन फायदेशीर ठरतं.

3) जास्त मिठाचं सेवन – तुम्ही जर मिठाचं अतिसेवन करत असाल तर एका खास प्रकारच्या लिक्वीडची कमतरता जाणवल्यानं देखील डोळ्यांखाली सूज किंवा काळी वर्तुळं येतात. यासाठी मिठाचं सेवन प्रमाणात हवं. अतिसेवन करणं टाळावं.

4) झोपण्याची पद्धत बदला – जर तुम्ही सतत एकाच कुशीवर किंवा पोटावर झोपत असाल तर ट्राय करा की, झोपताना तुमचं डोकं शरीरापेक्षा थोडं वर उचललेलं असेल. तुमचा चेहरा आणि डोळे रात्रभर कोणत्याही उशांमध्ये किंवा चादरीत नसावं याची काळजी घ्या.

5) कोल्ड कॉम्प्रेस – यासाठी एक चमचा फ्रीजरमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर बाहेरच्या बाजूनं हा चमचा डोळ्यांवर ठेवून हलकेच दाबा. यामुळं डोळ्यांची सूज कमी होईल.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांचा अ‍ॅलर्जीही असते.