Night Hair Care Tips : महिलांनो, केस ओले ठेवून झोपत असाल तर पडेल टक्कल, होतील ‘हे’ 4 दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   दिवसा वेळ नसल्याने अनेक महिला रात्री केस धुणे योग्य समजतात. पण तुम्हाला हे माहित आहे का, की ओले केस घेऊन झोपल्याने किती नुकसान होऊ शकते. होय, सातत्याने असे केल्यास तुम्हाला टक्कलदेखील पडू शकते. केसांच्या बाबतीत अनेक चुका महिलांकडून होत असतात. त्यातच केस ओले ठेवणे निष्काळजीपणाचे लक्षण आहे. या सवयीमुळे कोणते नुकसान होऊ शकते ते जाणून घेवूयात.

1  टक्कल पडू शकते

आले केस घेऊन बिछाण्यावर झोपल्याने केसांची मुळे कमजोर होतात. याशिवाय केसाच्या मुळाशी एकप्रकारच्या फंगलचा संसर्ग होतो. ज्यामुळे खाज सुटू शकते.

2  केसात कोंडा होणे

डोक्यातील उष्णता आणि खुप वेळ केस ओले ठेवल्याने, केसात कोंडा होऊ शकतो. ओले केस ठेवून झोपल्याने केसातील नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे ड्रायनेस येऊन कोंडा होतो.

3  बॅक्टेरियांमध्ये वाढ

पाणी आणि उष्णतेमुळे बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे ओले केस ठेवून झोपल्यास उशीवर बॅक्टेरिया निर्माण होण्यास सुरूवात होऊ शकते. डोक्यातील उष्णता हानिकारक बॅक्टेरियांसाठी चांगले वातावरण तयार करते.

4  तब्येत बिघडू शकते

ओले केस ठेवून झोपल्याने थंडी जाणवेल आणि तुमची प्रकृतीही बिघडू शकते. यासाठी ब्लो ड्राय करून आणि पायात मोजे घालून झोपा.