Covid-19 वॉरियर्सच्या मुलांसाठी MBBS मध्ये 5 जागा असतील ‘राखीव’ : आरोग्यमंत्री हर्षवर्धन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसशी पहिल्या फळीत लढत असलेल्या वॉरियर्ससाठी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की, बॅचलर ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजे एमबीबीएसमध्ये कोरोना वॉरियर्सच्या मुलांसाठी पाच जागा रिझर्व्ह राहतील. सरकारी वृत्तसेवा प्रसार भारतीनुसार, आरोग्यमंत्र्यांनी हेसुद्धा सांगितले की, कोण लोक कोविड वॉरियर्सच्या कक्षेत येतील.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही घोषणा केली आहे की, मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस जागांमध्ये 5 जागा कोविड वॉरियरच्या मुलांसाठी आरक्षित राहतील. केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले की, कोविड वॉरियर ते आहेत जे जमिनीवर काम करणारे आशा कार्यकर्ते आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर किंवा नर्स आहेत. त्यांच्या मुलांसाठी राष्ट्रीय कोट्यात 5 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मेरिटच्या आधारावर त्यांचे नामांकन केले जाईल.

कधीपासून हे लागू होणार?

आरोग्य मंत्रालयाने केंद्रीय पूल एमबीबीएस / बीडीएस जागांतर्गत 2020-21 साठी वॉर्ड ऑफ कोविड वॉरियर्सच्या उमेदवारांची निवड आणि नामांकनासाठी नव्या श्रेणीला मंजुरी दिली.

सांगण्यात आले की, शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी या श्रेणीसाठी पाच केंद्रीय पूल एमबीबीएस जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी फिक्की लेडीज ऑर्नायडेशनच्या एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली.