पुण्यातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन

पोलिस आयुक्‍तालयातील 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या आज (बुधवारी) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्‍त रश्मी शुक्‍ला यांनी शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांच्या मोठया प्रमाणावर बदल्या केल्या होत्या. त्यानंतर आज 5 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी नवीन नेमणुकीच्या ठिकाणी त्वरीत हजर होवुन कार्यभार ग्रहण करावा आणि कार्यभार हस्तांतरण प्रमाणापत्रासह अनुपालन अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश पोलिस उपायुक्‍त स्वप्ना गोरे यांनी दिले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3dcdb43c-d214-11e8-babb-bb916133801b’]

राज्यातील 29 सहाय्यक पोलिस आयुक्‍तांना उपायुक्‍तपदी बढती

पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीप्रमाणे पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आस्थापनेवर कार्यरत असलेल्या 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे त्याबाबत लिहीले आहेत. व.पो.नि. हेमंत वासुदेव भट (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, डेक्‍कन ते पीसीबी, गुन्हे शाखा), अनिल गुलाबराव पाटील (वाहतुक शाखा ते व.पो.नि. कोंढवा पोलिस स्टेशन), राजकुमार दत्‍तात्रय वाघचौरे (व.पो.नि. येरवडा पोलिस स्टेशन ते सायबर सेल, गुन्हे शाखा), मिलींद वसंतराव गायकवाड (व.पो.नि. कोंढवा ते विशेष शाखा-2) आणि भास्कर मधुकर जाधव (पोलिस निरीक्षक-गुन्हे-अलंकार  पोलिस स्टेशन ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक डेक्‍कन पोलिस स्टेशन). आगामी काळात इतर पदांवरील अधिकार्‍यांच्या देखील अंतर्गत बदल्या होणार असल्याची सध्या चर्चा आहे. गणेशोत्सव झाल्यानंतर काही पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होणार होत्या हे निश्‍चित होते. त्या बदल्या आज (बुधवारी) झाल्या आहेत.