‘या’ 5 सोप्या पद्धतीने खा आवळा, दूर होतील विविध आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. शरीरातील पोषक तत्वांची पूर्तता किंवा अँटीऑक्सीडेंची कमतरता भरून काढण्यासाठी याचे सेवन जरूर करावे. आवळ्याच्या सेवनाने मेंदूचे आजार, श्वासरोग आणि हृदयरोग दूर होतात. नेत्रदृष्टी व आतड्यांची कार्यशक्ती वाढण्यास मदत होते. यकृत स्वस्थ होऊन पचनशक्ती वाढते. तसेच रक्तशुद्धीकरण व रक्ताभिसरणही चांगले होते. आवळ्याचे हे गुण अनेकांना माहित असतात. मात्र आवळा खाण्याचे सर्वप्रकार बऱ्याच जणांना महित नसतात. आवळा खाण्याचे काही खास प्रकार आपण जाणून घेणार आहोत.

1) मिठ आणि आवळा
आवळे कापून त्यावर चवीनुसार मीठ टाकून खा. दररोज रिकाम्यापोटी अशाप्रकारे आवळे खावेत. मात्र, संध्याकाळी आवळा खाऊ नये.

2) हळद-मिठ
आवळे चांगल्याप्रकारे धुवून घेऊन त्यावरील रेषा चाकूने कापून घ्या, त्यानंतर पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून आवळे उकळून घ्या. थोड्यावेळाने हे आवळे तुम्ही खाऊ शकता. हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते.

3) आवळ्याची भाजी
आवळ्याची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. शिवाय बनविण्यासही सोपी आहे. या भाजीला अधिक चवदार बनवण्यासाठी यामध्ये थोडासा गुळ टाकावा.

4) सुकवलेला आवळा
आवळ्याचे बारीक-बारीक पातळ तुकडे करावेत. कापलेल्या तुकड्यांवर लिंबाचा रस आणि मीठ लावून मोठ्या ताटात हे तुकडे पसरवून उन्हात वाळवावेत. हे तुकडे वाळल्यानंतर एका डब्ब्यात भरून ठेवा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी या आवळ्याते तुकडे खा.

5) आवळा ज्यूस
आवळ्याच्या ज्यूस करून पिल्याने त्यातील तत्त्व रक्तामध्ये मिसळून थेट हाडांपर्यंत पोहोचतात. चार आवळ्यांचे छोटे-छोटे तुकडे, एक चमचा आवळ्याचे चूर्ण, अर्धा चमचा दगडफुल चूर्ण, एक चमचा मध, अर्धा कप पाणी घेऊन त्यामध्ये आवळ्याचे छोटे-छोटे तुकडे, आवळा चूर्ण आणि दगडफूल चूर्ण मिसळून घ्या. त्यानंतर मध मिसळून हे मिश्रण सेवन करा.

Visit : Policenama.com