Covid-19 Recovery Rules : कोविड-19 मधून लवकर ‘रिकव्हर’ व्हायचे असेल तर ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोविड एक असा आजार आहे ज्यामध्ये आपली काळजी आपण स्वत: घेतली पाहिजे. तुमचे नातेवाई, शेजारी, खाणे-पिणे तुमच्यापर्यंत पोहचवू शकतात, परंतु तुम्हाला खाऊ घालू शकत नाहीत. यामध्ये आजारी पण तुम्हीच आणि काळजी घेणारे सुद्धा तुम्हीच आहात. या आजारातून लवकर रिकव्हर व्हायचे असेल तर काही नियम पाळून हे युद्धा जिंकू शकता.

हे 5 नियम आहेत यशस्वी

1- व्हिटॅमिन डी चे सेवन करा म्हणजे सकाळी उन घ्या :
कोरोनातून रिकव्हर होण्यासाठी व्हिटॅमिन डी खुप आवश्यक आहे. तुम्ही सकाळी उन्हात 10-15 मिनिटे उभे रहा. उन्हाळा असल्याने उन जास्त आहे, सकाळी-सकाळी हलक्या उन्हात बसा. अन्यथा डिहायड्रेशन होण्याचा धोका वाढू शकतो.

2- प्राणायाम करा :
जर तुम्ही संक्रमित झाला असाल तर शरीरात कमजोरी जास्त असते यासाठी हळुहळु हलके व्यायाम करा. शरीरात ऑक्सीजन लेव्हल चांगली ठेवण्यासाठी अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायाम करा.

3- डाएटवर लक्ष द्या :
कोरोनातून रिकव्हरीनंतर शरीरात खुप कमजोरी असते. अशावेळी आहाराकडे लक्ष द्या. रोज सकाळी खजूर, मनुके, बदाम आणि अक्रोड खा.

4- शेवग्याचे सूप प्या :
या आजारामुळे हाडे आणि मांसपेशीत वेदनांची तक्रार समस्या असते. यासाठी शेवग्याचे सूप प्या. यात भरपूर कॅल्शियम आणि फॉस्फोरस असते. ज्यामुळे डिप्रेशन, भीती आणि थकवा दूर होतो.

5. गरम मसाल्याचा काढा प्या :

किचनमधील गरम मसाले इम्यूनिटी वाढवून तुम्हाला निरोगी ठेवतात. यासाठी जीरे, धने आणि बडीसोपचा काढा प्या. यामुळे रक्त स्वच्छ राहते आणि तणाव दूर होतो.