हातावर दिसतात ‘या’ आजारांचे संकेत, वेळीच व्हा सावध

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपण हातांच्या छोट्या-मोठ्या त्रासांकडे दुर्लक्ष करतो. परंतु, या समस्या काही आजारांचे संकेत असू शकतात. हे संकेत ओळखून योग्यवेळी उपचार घेतल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे असे संकेत शरीराकडून मिळत असल्यास त्याकडे गांभिर्याने पाहिजे पाहिजे. हे संकेत कोणते त्याची आपण माहिती करून घेवूयात.

मॉश्चरायजरने स्किन ठिक झाली नाही तर एक्जिमा असू शकतो. यामध्ये स्किनवर रॅशेज आणि खाज येते आणि त्वचा फाटते. यासाठी व्हिटॅमिन ए युक्त क्रीमचा वापर करा. तसेच हातावर रेड पॅचेस येत असतील तर लिव्हर प्रॉब्लम असू शकतो. लिव्हरचे फंक्शन योग्य प्रकारे होत नसेल तर ब्लड सर्कुलेशन खराब होते आणि हातावर ब्लड वेसेल्स दिसतात. स्ट्रेस आणि जास्त अ‍ॅक्टिव्ह थायरॉइडमुळे मेटाबॉलिजम फास्ट होते. यामुळे बॉडी कॅलरी बर्न करते आणि जास्त घाम येतो. ही समस्या जास्त झाल्यास डॉक्टरांकडे जावे.

हातांच्या पोर्समध्ये सूज असेल तर बॉडीमध्ये हाय कोलेस्ट्रॉलचा संकेत असतो. जास्त कोलेस्ट्रॉल असणे हार्टसाठी धोकादायक असते. डायटमध्ये लसुण, अद्रक, बीन्स यांसारखे कोलेस्ट्रॉल कमी करणारे पदार्थ समविष्ट करावेत.