द्राक्ष हंगामाला जोरदार सुरुवात, नाशिकमधून ‘या’ 10 देशात 5 हजार मैट्रिक टन निर्यात

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – लांबलेला पाउस आणि अवकाळी मुळे द्राक्ष निर्यात उशीराने सुरू झाल्याने याचा फटका निर्यातक्षम द्राक्षला बसला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याच्या पंधरवाड्या पासून द्राक्ष हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून २८ जानेवारी पर्यन्त ३६४ कंटेनर द्वारे ५ हजार मैट्रिक टन द्राक्ष निर्यात झालेली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक द्राक्ष नेदरलैंड आणि जर्मनी या बाजारपेठेत निर्यात झाली आहे. परकीय बाजार पेठेत द्राक्ष निर्यात जोरदार सुरुवात झाली आहे. त्या तुलनेत राज्याच्या द्राक्ष शिवारात संथ हालचाली आहेत. निर्यातक्षम द्राक्षांची ९० ते १२० रु. प्रतिकिलोने खरेदी सुरू आहे, तर स्थानिक पातळीवर अवघे ३० ते ४० रूपये दराने विकली जात आहेत.

यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. कूज आणि डावणी, भुरी नियंत्रणासाठी कसरत करूनही ४० टक्के बागा गेल्या. त्यामुळे यंदा द्राक्ष चांगला भाव खातील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. त्याचप्रमाणे निर्यातक्षम द्राक्ष चांगला दर मिळवत असून, स्थानिक पातळीवर मिळत असलेल्या दराने खर्चदेखील फिटत नसल्याने शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. देशात द्राक्ष उत्पादनात नाशिक जिल्हा अग्रेसर असून, नाशिकच्या द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.

जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, सटाणा, बागलाण, नाशिक, सिन्नर तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची शेती केली जाते. दूसरी कडे द्राक्ष बाग निर्यात नोंदणी ३३ हजार १४४ शेतकऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यतील अनेक शेतकरी आपल्या शेतात बागा लावून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष पिकवितात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात होऊन परदेशात पाठविला जातो.

२८ जानेवारी २०२० पर्यंत द्राक्ष निर्यात –

नेदरलेंड – २३८ कंटेनर -३१६० मैट्रिक टन
जर्मनी – ६४ कंटेनर -८३० मैट्रिक टन
यूनाइटेड किंडम – ३० कंटेनर -३९२ मैट्रिक टन
सोलवेनिया – ७ कंटेनर -९३ मैट्रिक टन
डेनमार्क – ६ कंटेनर -७४ मैट्रिक टन
फिनलैंड – ४ कंटेनर -५० मैट्रिक टन
लिथुनिया – ३ कंटेनर -४७ मैट्रिक टन
स्पेन – २ कंटेनर -२४ मैट्रिक टन
फ्रांस – १ कंटेनर -१४ मैट्रिक टन
इटली -१ कंटेनर -१३ मैट्रिक टन

फेसबुक पेज लाईक करा