Realme चा 64MP कॅमेरा असलेला स्मार्टफोनवर मिळतोय 5 हजार रुपयांचा डिस्काउंट !

पोलीसनामा ऑनलाइन टीम –    Flipkart वर सध्या Realme Days सेल सुरु आहे. या सेलचा आजचा हा दुसरा दिवस आहे. या सेलमध्ये Realme च्या सर्व स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. त्यानुसार, Realme 6 सारखा बेस्ट स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत खरेदी करता येऊ शकतो. ग्राहकांना या डिलचा मोठा फायदा होणार आहे.

Realme 6 हा स्मार्टफोन बेस्ट डिलवर ठेवण्यात आला आहे. Realme चा Realme 6 हा स्मार्टफोन 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसह मिळत आहे. फ्लिपकार्टवर देण्यात आलेल्या ऑफरनुसार, Realme 6 हा स्मार्टफोन 17,999 रुपयांऐवजी 12,999 रुपये किमतीत उपलब्ध आहे. ही किंमत 4GB+64GB वेरियंटच्या स्मार्टफोनसाठी असेल. कंपनीने या स्मार्टफोनला दोन वेरियंटमध्ये लाँच केले आहे. Comet Blue आणि Comet White मध्ये हा स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहे.

Realme 6 मध्ये 6.5 इंचचा पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 90.5 टक्के आहे. ग्राहक हा स्माार्टफोन दोन रंगामध्ये खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G90T प्रोसेसर देण्यात आला आहे.

क्वाड कॅमेरा सेटअप

या स्मार्टफोनमध्ये Realme 6 च्या रिअरमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. तसेच यातील विशेष फिचर्स म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूस 8MP चा अल्ट्रा-वाईड एँगल लेन्स, 2 MP चा पोट्रेट लेन्स आणि 2 MP चा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 MP चा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

तसेच या स्मार्टफोनमध्ये AI ब्युटी मोड, पोट्रेट मोड, HDR सेल्फी मोड दिला जात आहे. तर या स्मार्टफोनमध्ये 4300 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन 30W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट करतो.