या ‘वेडिंग सीझन’मध्ये होणार आहात वधू ? ‘हे’ 5 घरगुती उपाय चेहर्‍यावर आणतील ‘ग्लो’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – या हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही विवाह बंधनात अडकणार आहात का. जर उत्तर होय असेल तर आपल्या चेहर्‍यावर ग्लो आणण्यासाठी आतापासून तयारी सुरू करा. या कालावधीत तणावमुक्त राहणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. सध्या ब्यूटी पार्लरमध्ये सुद्धा लग्नाच्या अगोदरपासूनच फेयरनेस ट्रीटमेंट सुरू होतात. पण, छोटे-छोटे घरगुती उपाय करून सुद्धा तुम्ही आपल्या लग्नाच्या दिवसापर्यंत आणखी सुंदर दिसू शकता :

हे उपाय करा
1. आठवड्यात किमान 5 दिवस 20 ते 30 मिनिटांपर्यंत वॉक जरूर करा. हे केल्याने तणाव कमी होईल आणि ब्लड सक्युर्लेशन वाढेल. यामुळे त्वचा उजळेल.

2. आजपासूनच बॉडीसोपला बाय-बाय करा. एखाद्या माइल्ड ब्यूटी फेस वॉशचा वापर सुरू करा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा आवश्य स्वच्छ करा.

3. रात्री एक असे मॉयश्चरायजर निवडा ज्यामध्ये अँटी-ऑक्सीडेंट असेल. मॉयश्चरायजर व्हिटॅमिन ए, सी, ई आणि बी 3 ने युक्त असेल तर त्वचेचे पोषण होईल.

4. रासायनिक वस्तूंचा वापर कमीत कमी करा. कोणतेही उत्पादन वापरण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उत्पादनाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नका.

5. जर तुम्हाला खुप जास्त घाम येत असेल तर आणि तुम्हाल धूळ आणि अस्वच्छ वातावरणात काम करावे लागत असेल तर रोज हेयर वॉश आवश्य घ्या. शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडीशनर करण्यास विसरू नका. केसांना तेल लावणे सुद्धा आवश्यक आहे. यामुळे केस निर्जिव आणि कोरडे होत नाहीत.