कामाची गोष्ट ! मोबाइलची बॅटरी सारखी डाऊन होते मग करा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या धकाधकीच्या जिवनात मोबाइल फोन अत्यावश्यक बनला आहे. घरात-ऑफिसामध्ये बसून मोबाइलवर अनेक कामं मिनिटाच्या आत केली जातात. लॉकडाऊनच्या काळात मोबाइल सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, जीमेल यांसह अनेक सोशल मीडिया हाताळला जातो. काही जण तर तासनतास मोबाइलवर असतात. त्यामुळे मोबाइलची बॅटरी लगेच कमी होते. त्यामुळे मोबाइल सतत चार्जिंगला लावावा लागतो. परंतु, सतत चार्जिंग करणं अनेकदा जमत नाही.

कधी प्रवासात बॅटरी लवकर संपून जाते. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. बॅटरी लवकर संपणार नाही आणि बॅटरी बॅकअप वाढेल यासाठी काही मोबाइलमध्ये खास स्ट्रिक्स आहेत. मोबाइलमधील सेटिग्ज बदलून बॅटरी लाईफ वाढवता येऊ शकते. केवळ पाच सोप्या टिप्स आहेत. याच्या मदतीने स्मार्टफोनच्या बॅटरीची लाईफ वाढवता येऊ शकते.

1. GPS लोकेशन ऑफ करा
लोकेशन सर्व्हिस ऑन असल्याने बॅटरी वेगाने कमी होते. कारण, चांगली सुविधा देण्यासाठी जीपीएस प्रोसेसिंग पॉवरचा वापर करीत असते. गरज पडल्यास जीपएस ऑन करा. परंतु गरज नसल्यास मोबाइलमधील जीपीएस बंद करा. लोकेशन सर्व्हिस ऑन किंवा ऑफ पर्याय याची निवड करायची असेल तर मोबाइलमधील सेटिंग्समध्ये जाऊन क्विक सेटिग्स टॉगलमध्ये तुम्हाला पर्याय मिळले.

2. Dark Mode ऑन करा
अँड्रॉयड डिव्हाईसेस आणि खूप साऱ्या अ‍ॅप आता डार्क मोडचा पर्याय देत असतात. ज्याच्या इटरफेसवर डार्क थीम अप्लाय होतो. जर स्मार्टफोनमध्य AMOLED किंवा OLED स्क्रीन दिलेली असेल तर या मोडच्या मदतीने बॅटरी वाचवता येऊ शकते. त्यामुळे अशा डिस्प्लेंवर ब्लॅक कलरचा पिक्सल ऑफ होतो. तसेच बॅटरीचा वापर केला जात नाही. बॅटरी वाचवण्यासाठी गरज पडल्यास डार्क मोड इनेबल करा.

3. बॅटरी युज करणारे अ‍ॅप्स अनइन्स्टॉल करा
काही अ‍ॅप्समध्ये काही तरी बग किंवा कमतरता असते. त्यामुळे हे अ‍ॅप्स सर्वात जास्त बॅटरी खर्च करतात. त्यामुळे तुम्हाला जर बॅटरी वाचवायची असेल तर बॅटरीचा वापर करणाऱ्यांची मॉनिटरींग करा. यासाठी सेटिंग्समध्ये आणि बॅटरीत या ऑप्शनमध्ये जा. त्या ठिकाणी पॉवर युजेसला टॅप करा. या ठिकाणी तुम्हाला सर्वात जास्त बॅटरीचा वापर करणाऱ्या अ‍ॅप्सची यादी दिसेल. यातील तुम्हाला जे अ‍ॅप गरजेचे वाटत नसतील ते अनइन्स्टॉल करा.

4. बॅकग्राउंड अ‍ॅप्सची लिमिट ठेवा
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये एकत्र खूप सारे अ‍ॅप्स बॅकग्राऊंडमध्ये अ‍ॅक्टिव असतील तर जास्त बॅटरी खर्च होत असते. कोणतेही अ‍ॅप ओपन केल्यानंतर सरळ होम पेजवर गेल्यास अ‍ॅप बॅकग्राऊंडवरच सुरु राहते. काम संपल्यानंतर रिसेट अ‍ॅप्समध्ये अ‍ॅप्लिकेशन्स बंद करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन कोणतेही अ‍ॅप सिलेक्ट करू शकता. अ‍ॅप सिलेक्ट केल्यानंतर Don’t run in background सुद्धा सिलेक्ट करू शकता.

5. लाइट अ‍ॅप्स स्विच करा
मोबाइलमधील अनेक अ‍ॅप्स लाइट व्हर्जन प्ले स्टोरवर उपलब्ध आहेत कमी स्टोरेज शिवाय कमी बॅटरी आणि प्रोसेसिंग पॉवर सुद्धा देण्यात आलेले आहेत. या प्रमाणे प्रसिद्ध अ‍ॅप्स लाइट व्हर्जन डाऊनलोड करून तुम्ही तुमची बॅटरी वाचवू शकता. काही अ‍ॅप्सला वेब बेस्ड इंटरफेसवर वापर केला जावू शकतो. त्यामुळे या साध्या साध्या गोष्टी आपण आपल्या मोबाइलमध्ये लक्षपूर्वक वापरायला सुरुवात केली तर तुमच्या मोबाइलमधील बॅटरी बॅकअप चांगला राहिल.