बहिणीकडे पाहून हसण्याच्या कारणावरून टोलक्याचा कॉलेजात घूसून युवकावर जीवघेणा हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बहिणीकडे पाहून हसतो म्हणून तरुणाने साथीदारांसोबत मिळून पर्वती पायथ्याजवळील श्री शाहू महाविद्यालयाच्या आवारातच धारदार शस्त्रांनी वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम पिंगळे (वय १९, रा. आंबेगाव, धनकवडी) हा तरुण या घटनेत जखमी झाला असून त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार ६ ते ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पिंगळे हा पर्वती पायथा येथील श्री शाहू महाविद्याालयाच्या आवारातील आयटीआय शिक्षण घेतो. गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास तो आयटीआयच्या आवारात थांबला होता. त्यावेळी हल्लेखोर मुलं तिथं आली. त्यातील एकाने माझ्या बहिणकडे पाहून हसतोस का? असे म्हणत त्याने आणि त्याच्या साथीदाराने पिंगळे याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले आणि रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तेथे टाकून पळून गेले. त्यावेळी शुभम पिंगळेला तात्काळ दवाखान्यात दाखल कऱण्यात आले. दरम्यान बहिणीला छेडण्याच्या कारणावरून त्यांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपासस पोलीस उपनिरीक्षक पी. डी. हजारे या करत आहेत.