दिल्लीहून बंगळुरूला पोहचला 5 वर्षाचा ‘विहान’, 3 महिन्यानंतर भेटणार्‍या आईनं विमानतळावर केलं ‘रिसीव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक जण आपल्या घरापासून बाहेर अडकले आहेत. देशात कोरोना संक्रमणाचा आकडा वाढत असताना लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झाला आहे. मात्र, या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता देण्यात आली आहे. देशांतर्गत विमान वाहतूक सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक जण आपआपल्या घरी परतत आहेत.

लॉकडाऊनमुळे एक 5 वर्षाचा मुलगा आपल्या आईपासून गेल्या 3 महिन्यापासून दूर होता. आईकडे जाण्यासाठी त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. अशावेळी देशांतर्गत विमान वाहतूक सुरु झाल्यानंतर दिल्लीहून या 5 वर्षाच्या मुलाने एकट्याने कर्नाटकपर्यंत विमान प्रवास केला. विहान शर्मा असं या 5 वर्षाच्या मुलांच नाव आहे. विहान मागील 3 महिन्यापासून दिल्लीत त्याच्या आजी-आजोबांच्या घरी अडकला होता.

विहानने दिल्ली ते बंगळुरू असा प्रवास एकट्याने विमानाने केला आहे. बंगळुरू एअरपोर्टला पोहचल्यानंतर त्याची आई त्याला नेण्यासाठी आली होती. एअरपोर्टला पोहचल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी त्याची आई त्याला दिसली. तब्बल 3 महिन्यांनी आई आणि मुलाची भेट झाली. पण त्यावेळी आईने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुलाची गळाभेट घेणे टाळले. आतापर्यंत कर्नाटक विमानतळावर दोन प्लाईट्स लँडिंग झाल्या आहेत. त्यातील एका प्लाईटमधून विहान बंगळुरुत परतला आहे.

दरम्यान, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी रविवारी सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. प्रवाशांना त्यांच्या मोबाईल फोनवर आरोग्यसेतू अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे लागेल. विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था राज्यांना करावी लागेल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या कोविड -19 ची लक्षणं आढळल्यास राज्ये त्यांची स्वत: ची क्वारंटाईन किंवा आयसोलेशन व्यवस्था तयार करु शकतात. आजपासून विमानसेवा सुरु होत असून नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे नियम व मार्गदर्शक तत्वे रविवारी जाहीर केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like