मानलेल्या भावाने केलं ५ वर्षाच्या मुलीवर ‘कुकर्म’, रक्षाबंधनच्या दिवशी प्रकार उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ज्याला तिने भाऊ मानले, त्यानेच घात करुन तिच्या ५ वर्षाच्या मुलीवर  अत्याचार केल्याचा प्रकार रक्षाबंधनाच्या दिवशी उघड झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. हेमंत कृष्णा तांडेल (वय ३५, रा. मोरवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत एका २६ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना १ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या महिलेने हेमंत तांडेल याला आपला भाऊ मानले होते. त्यामुळे तो त्यांच्या घरी ये जा करीत होता. त्याचा फायदा घेऊन तांडेल याने १ ऑगस्ट रोजी या महिलेच्या ५ वर्षाच्या मुलीबराेबर अश्लिल चाळे केले व तिच्यावर अत्याचार केले. काल रक्षाबंधनाच्या दिवशी तो त्यांच्या घरी आला असताना हा प्रकार समोर आला व त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या महिलेने थेट पोलीस ठाणे गाठत त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पिंपरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like