१२ वर्षीय मुलाकडून १0 वर्षीय मुलीवर अत्याचार

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – बारा वर्षीय अल्पवयीन मुलाने १0 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे उघडकिस आली आहे. पिडीत मुलगी ४ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलगा पसार झाला असून त्याच्यावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे पिडीत १० वर्षीय  मुलगी राहण्यास आहे. तिला त्रास होत असल्याने कुटुंबियांनी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यावर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याची बाब समोर आली. त्यानतंर पिडीतीने तिच्यावर १२ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा खुलासा केला. तो तिच्या घरामागेच राहण्यास होता. मागील चार महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी संबंधित मुलावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तो मुलगा मात्र पसार झाला आहे. पुढील तपास सुरु आहे.